शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Satara: हिंदकेसरी बैल ‘वजीर’ने घेतली ‘एक्झिट!, बैलगाडा शर्यतीत तुफानी वेगामुळे होता लोकप्रिय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:30 IST

Hind Kesari Wazir Death: पाचशेपेक्षा जास्त शर्यतीमध्ये फायनलमध्ये विजय पटकावला 

रहीमतपूर (जि. सातारा) : कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील बैलगाडा शर्यतीतील ‘बिनजोडचा बादशहा’ अशी बिरुदावली मिरवणारा हिंदकेसरी वजीर याची आजाराशी लढता-लढता सोमवारी रात्री प्राणज्योत मालवली. वजीरच्या अचानक झालेल्या निधनामुळे जयपूरसह वजीरप्रेमी दुःखाच्या खाईत लोटले गेले.सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील ‘वजीर’ हे नाव केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर बैलगाडा क्षेत्रात महाराष्ट्रभर ‘बिनजोडचा बादशहा’ म्हणून ओळखले जात होते. अनेक वर्षे अपराजित राहिलेल्या वजीरचा महाराष्ट्रात दबदबा होता. बैलगाडा अड्ड्यावर वजीरभोवती घुटमळणारी युवा पिढी पाहून वजीरवर किती जीव आहे, हे दिसून येत होतं.

तुफानी वेगामुळे लोकप्रिय

वजीरने आपल्या १७-१८ वर्षांच्या जीवनात पाचशेपेक्षा जास्त शर्यतीमध्ये फायनलमध्ये विजय पटकावला आहे. जयपूर येथील प्रकाश निकम, विकास निकम व दत्तात्रय निकम यांच्या दावणीला असलेला वजीर तुफानी वेगामुळे लोकप्रिय होता. 

‘वजीर’ला पाहण्यासाठी शर्यतप्रेमींची व्हायची गर्दीअड्ड्यावर ‘वजीर’ येणार म्हटलं की त्याला पाहण्यासाठी बैलगाडा शर्यतप्रेमींची प्रचंड गर्दी व्हायची. तहान भूक हरवून फायनल होईपर्यंत युवाप्रेमी मैदान सोडत नसे. असा हा महाराष्ट्राचा लाडका वजीर गेल्या दोन महिन्यांपासून आजाराशी लढत होता. मजबूत शरीरयष्टीचा वजीर आजारपणामुळे कमजोर झाला होता, हे पाहून निकम कुटुंबीयांचं मन हेलावत होतं. सोमवारी (दि. २१) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास वजीरची प्राणज्योत मालवली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBull Cart Raceबैलगाडी शर्यतDeathमृत्यू