शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुवाधार पाऊस; सातारा जिल्ह्यातील वीर, कण्हेर, धोम धरणांतून मोठा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:28 IST

धरणांतून विसर्ग वाढला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सातारा : जिल्ह्याचा पश्चिम भाग रविवारी मुसळधार पावसाने चिंब झाला. प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असून, रविवारी सायंकाळी विसर्ग वाढवून ३१,७४६ क्युसेक पाणीनदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात सायंकाळपर्यंत ८५.३० टीएमसी पाणीसाठा होता.दरवर्षी रिमझिम बरसणाऱ्या श्रावण महिन्यात आषाढ सरी कोसळू लागल्या आहेत. पाटण, जावली, सातारा तालुक्यांचा पश्चिम भाग, महाबळेश्वर तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्यामुळे विसर्ग वाढविण्यात आला आहे.काेयना धरणात रविवारी सायंकाळपर्यंत ८५.३० टीएमसी साठा झाला होता, तर आवक ५४,८०१ क्युसेक इतकी होती. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रविवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटांवरून साडेसहा फुटांपर्यंत उघडून २९,६४६ क्युसेक विसर्ग सुरू केला. याशिवाय पायथा विद्युतगृहातूनही २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.यामुळे कोयना नदीमध्ये एकूण ३१ हजार ७४६ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. कोयना व कृष्णा नदीची पातळी वाढत असल्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरणे, शेती साहित्य व जनावरे ठेवणे टाळावे, असे आवाहन सातारा सिंचन विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, पाचगणीत न्यू इरा शाळेजवळील संरक्षक भिंत कोसळल्याने प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद झाली.

वीर, कण्हेर, धोम मधूनही मोठा विसर्ग

  • वीर धरणाचा विसर्ग रविवारी सकाळी सहा वाजता वाढवून नीरा नदी पात्रात १४,४९६ क्युसेक पाणी सोडण्यात आले.
  • कण्हेर धरणातून येवा लक्षात घेऊन रविवारी सकाळी नऊ वाजता वेण्णा नदी पात्रात ५५५० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. हामदाबाज-किडगाव व करंजे-म्हसवे गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी जाण्याची शक्यता आहे. यामुळे हे रस्ते बंद केले आहेत.
  • धोम धरण ९०.२३ टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे येवा वाढला आहे. त्यामुळे विसर्ग ७२७० क्युसेक करण्यात आला.
  • उरमोडी धरणातून दुपारी १२ वाजता ५०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला.

प्रमुख धरणांमधील पाणी पातळी (टीएमसीमध्ये)

  • कोयना - ८५.३
  • धोम - १२.२७
  • बलवकडी - ३.४८
  • कण्हेर - ८.७७
  • उरमोडी - ८.४९
  • तारळी - ५.०४