शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

आलिशान गाडीतून आले, दुकानातील रोकड घेऊन पसार झाले; देगाव फाट्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 16:03 IST

‘सुटे पैसे आहेत का,’ अशी विचारणा त्यांनी दुकानात असलेल्या अकाउंटंट ज्योती पवार यांच्याकडे केली. त्यावेळी पवार यांना बोलण्यामध्ये गुंतवून दुकानातील ड्राॅव्हरमध्ये पुरुषाने हातचलाखी करून ७० हजारांची रोकड काढून घेतली

सातारा : आलिशान गाडीतून येऊन पुरुष व महिलेने एका दुकानातून शिरून तेथील अकाउंटंटला बोलण्यामध्ये गुंतवून दुकानातील ७० हजारांची रोकड हातोहात लांबविली. ही घटना देगाव फाट्यावरील एका दुकानात काल, सोमवारी घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, योगेश नानशंद ओसवाल (वय २८) यांचे देगाव फाट्यावर धनराज स्टील या नावाचे दुकान आहे. या दुकानामध्ये सोमवारी दुपारी अकाउंटंट ज्योती पवार या एकट्याच होत्या. त्यावेळी एका आलिशान कारमधून एक महिला आणि पुरुष त्यांच्या दुकानात आले. ‘सुटे पैसे आहेत का,’ अशी विचारणा त्यांनी दुकानात असलेल्या अकाउंटंट ज्योती पवार यांच्याकडे केली. त्यावेळी पवार यांना बोलण्यामध्ये गुंतवून दुकानातील ड्राॅव्हरमध्ये पुरुषाने हातचलाखी करून ७० हजारांची रोकड काढून घेतली. त्यानंतर काही वेळात दोघेही तेथून निघून गेले.तासाभरानंतर ओसवाल हे दुकानात परत आले असता त्यांना ड्रॉव्हरमधील रोकड कमी असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता एक महिला व एक पुरुष ही रोकड चोरत असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.पोलीसही अवाक्संबंधित महिला व पुरुषाने आलिशान गाडीतून येऊन त्यांनी चोरी केल्याने पोलीसही अवाक् झाले आहेत. इतकी महागडी कार वापरणारा चोरटा कसा असू शकतो, असा प्रश्नही पोलिसांना पडला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी