शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Satara Crime: ..म्हणून ‘तो’ चक्क दरोडेखोर बनला, हातात पैसा खेळायला लागला; अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 15:37 IST

अचानक सुधारलेली त्याची आर्थिक परिस्थिती इतरांच्या नजरेतून मात्र सुटली नाही.

सातारा : भावाभावांतील वाद आपण सर्रास सर्व ठिकाणी पाहत असतो. संपत्तीवरून एकमेकांचा जीव घेण्याइतपत हा वाद विकोपाला जातो. असे चित्र एकीकडे दिसत असताना एक भाऊ मात्र, भावाच्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी पहिली चोरी करतो. यातून त्याची आर्थिक गरज भागते; मात्र, पुढे ही गरजच त्याची सवय बनून तो दरोडेखोर म्हणून ओळखला जाऊ लागतो. ही कहाणी एखाद्या चित्रपटातील नसून, सातारा पोलिसांनी पकडलेल्या एका अट्टल चोरट्याची आहे.सातारा तालुक्यातील वडूथ हे संजय मदने (वय ४२) याचे गाव. पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा त्याचा परिवार. अल्पभूधारक असलेला संजय हा दुसऱ्याच्या शेतात मजुरी करीत होता. एकत्र कुटुंब असताना १० वर्षांपूर्वी त्याच्या भावाला कॅन्सरचे निदान झाले. त्याच्या उपचारासाठी पैसे कोठून आणायचे म्हणून त्याने पत्नीचे दागिने गहाण ठेवले. या पैशांतून त्याने भावावर उपचार केले. मात्र, तरीही त्याचा भाऊ वाचला नाही. आता गहाण ठेवलेले दागिने कसे सोडवायचे, या विवंचनेत तो असताना त्याने यावर उपाय म्हणून चोरीचा मार्ग स्वीकारला. पहिली चोरी त्याने स्वत:च्या गावातच केली. यातून काही पैसे त्याच्या हाताला लागले. सहज आणि कमी वेळात बक्कळ पैसा मिळत असल्याने त्याला मजुरी करण्याऐवजी चोरीचा मार्ग खुणावू लागला. सुरुवातीला एकटाच बंद घरे हेरून चोरी करू लागला. सातारा, कोरेगाव तालुक्यात दिवसा तो फिरायचा. घरातून कामानिमित्त बाहेर जातोय, असे सांगून तो निघायचा. पण, रात्री चोरी करूनच परत यायचा.हातात पैसा खेळायला लागल्यानंतर अचानक सुधारलेली त्याची आर्थिक परिस्थिती इतरांच्या नजरेतून मात्र सुटली नाही. ही माहिती कानोकानी पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच त्याने घरफोडीची कबुली दिली. या घरफोडीच्या गुन्ह्यात पहिल्यांदाच तो कारागृहात गेला. पण, कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो छोटामोठा नव्हे, तर अट्टल दरोडेखोर बनला.एक वर्षे कारागृहातसंजय मदने हा आठ वर्षांपूर्वी चोरीच्या गुन्ह्यात पहिल्यांदाच कारागृहात गेला. एक वर्ष तो कारागृहात होता. त्यानंतर तो बाहेर आला. आपण आता सुधारलोय, असं तो इतरांना भासविण्याचा प्रयत्न करायचा. मात्र, वाघाच्या तोंडाला एकदा का रक्त लागलं की तो शिकार करणं सोडून देत नाही, तसंच संजय मदनेच्या ताेंडाला गुन्हेगारीचं रक्त लागलं होतं. त्याने पाच वर्षांत १७ हून अधिक ठिकाणी घरफोड्या केल्या. त्याचं अक्षरश: राहणीमान बदलून गेलं. कित्येक वर्षे पोलिसांच्या यादीवर दुर्लक्षित असलेला संजय पुन्हा रेकाॅर्डवर आला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस