प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतले ६५ गावांचे पालकत्त्व
By Admin | Updated: November 24, 2014 23:14 IST2014-11-24T21:16:36+5:302014-11-24T23:14:24+5:30
स्वच्छ भारत मोहीम : कामकाजाचा घेतला आढावा

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतले ६५ गावांचे पालकत्त्व
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील सर्व गावांमध्ये अमुलाग्र बदल करण्यासाठी ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ६६५ गावांचे पालकत्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते, त्यानुसार या सर्व अधिकाऱ्यांनी गावभेटी देऊन गावच्या कामकाजाबाबत आढावा घेतला तसेच गावातील शाळांमधून ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रमही राबविला. त्यामुळे याा अभियानात आता प्रशासन दक्ष झाले असून गाव पातळीवर जागृतीची खरी गरज आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावातील स्वच्छतेबाबत व शौचालये नसलेल्या कुटुंबांची यादी प्रत्येकास देण्यात आली होती. त्यानुसार प्रजासत्ताक दिनापर्यंत प्रत्येक कुटुंबांचे शौचालय पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. त्यासाठी बहुआयामी व सुधारित कार्यक्रम अंगिकारण्यात आला आहे.
खंडाळ्याचे सभापती रमेश धायगुडे-पाटील यांनी पंचायत समिती स्तरावर केलेल्य नियोजनानुसार महसूल, कृषी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी गावातील शौचालये नसलेल्या कुटुंबांना भेटी दिल्या. प्रत्येक कुटुंबांच्या समस्या जाणून घेऊन शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले.
खंडाळा तालुक्यातील ६५ पैकी पाच गावे पूर्ण शौचालय असलेले आहेत. त्यामुळे उर्वरत ६० गावांमधील प्रत्येक ९ कुटुंबे अधिकाऱ्यांनी दत्तक घेऊन कामकाजास सुरुवात केली आहे. त्यामुळे आागामी दोन महिन्यांत पाचशे कुटुंब शौचालयधारक होणार आहेत. योजनेसाठी गरजू कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी शासकीय अनुदानही देण्यात येणार
आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानात तालुक्यात परिवर्तनीय काम होण्याची अपेक्षा
आहे. (प्रतिनिधी)
खंडाळा तालुक्यात यापूर्वी ग्रामस्वच्छता अभियानातही भरीव कामगिरी झाली होती. स्वच्छ भारत अभियानातही सामाजिक दायित्व पत्करून सर्व गावांमध्ये काम करण्याचा मानस आहे.
रमेश धायगुडे-पाटील
सभापती, पंचायत समिती, खंडाळा