कर्मवीर भाऊराव पाटील यांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 16:45 IST2020-05-09T16:45:12+5:302020-05-09T16:45:47+5:30

सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी शनिवारी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.

Greetings from Guardian Minister to Karmaveer Bhaurao Patil | कर्मवीर भाऊराव पाटील यांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

कर्मवीर भाऊराव पाटील यांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

ठळक मुद्देकर्मवीर भाऊराव पाटील यांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

सातारा : सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी शनिवारी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.

सहकार व पणन मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिस्थळास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, अ‍ॅड. दिलावर मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील उपस्थित होते.

Web Title: Greetings from Guardian Minister to Karmaveer Bhaurao Patil