सरसेनापती संताजी घोरपडे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:30+5:302021-06-20T04:26:30+5:30
कातरखटाव : सरसेनापती संताजी घोरपडे यांना ३२४ व्या पुण्यतिथीनिमित्त कारखेल, ता. माण येथे त्यांच्या समाधीस्थळावर अभिवादन करण्यात आले. पराक्रमी ...

सरसेनापती संताजी घोरपडे यांना अभिवादन
कातरखटाव : सरसेनापती संताजी घोरपडे यांना ३२४ व्या पुण्यतिथीनिमित्त कारखेल, ता. माण येथे त्यांच्या समाधीस्थळावर अभिवादन करण्यात आले. पराक्रमी सरसेनापती संताजी घोरपडे यांचे बोंबाळे, ता. खटाव येथील वंशज डॉ. सुहास घोरपडे यांनी कारखेल, ता. माण येथील समाधीस्थळावर जाऊन संताजी घोरपडे यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा दिला. पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी बोंबाळे कन्हेर, इस्लामपूर, कारखेल येथून लोक येत असतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने संताजी घोरपडे यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी संताजी घोरपडे यांचे वंशज डॉ. सुहास घोरपडे, संजय घोरपडे पुणे, दिलीप घोरपडे मुंबई, संजय घोरपडे वर्धनगड, रणधीर घोरपडे, भादूरवाडी व श्री संताजी प्रतिष्ठान पुणे यांचे सर्व कार्यकर्ते तसेच कन्हेर, इस्लामपूर, कारखेल येथील ग्रामस्थ हजर होते.
फोटो ओळ : कारखेल, ता. माण येथे सरसेनापती संताजी घोरपडे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डाॅ. सुहास घोरपडे व इतर उपस्थित होते.