शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

Satara Crime: मोफत साडी मिळण्याचा मोह आजीबाईंना भोवला, दोघा भामट्यांनी गंडा घातला

By दत्ता यादव | Updated: February 13, 2023 15:53 IST

..म्हणजे ते शेठ तुम्हाला साडी देतील.

सातारा : ‘तुम्ही गरीब दिसाल म्हणजे ते शेठ तुम्हाला साडी देतील. यासाठी तुमच्या गळ्यातील बोरमाळ काढून द्या, असे म्हणताच वृद्धेने बोरमाळ काढून दिली. मात्र, रुमालामध्ये बोरमाळ बांधण्याचे नाटक करत दोघा भामट्यांनी बोरमाळ लंपास करून वृद्धेला गंडा घातला. ही घटना राजवाडा परिसरातील सुमित्राराजे संकुल परिसरात रविवार, दि. १२ रोजी घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनंदा उद्धव इंदलकर (वय ७०, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) या रविवारी दुपारी राजवाड्यावर आल्या होत्या. त्यावेळी तेथे दोन तरुण आले. त्यातील एका तरुणाने त्यांच्याशी ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला. तो तरुण त्यांना म्हणाला, ‘एक दुकानदार आहे. त्याला दहा वर्षांनी मुलगा झाला आहे. त्या बाळाला आशीर्वाद दिला तर ते शेठ साडी वगैरे दान देतात. पण तुमच्या गळ्यात सोन्याची बोरमाळ आहे. त्यामुळे ते तुम्हाला साडी देणार नाहीत. तुम्ही गरीब दिसायला हवे. यासाठी गळ्यातील बोरमाळ काढा,’ असं त्यानं सांगितलं. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुनंदा इंदलकर यांनी बोरमाळ काढून त्या तरुणाच्या हातात दिली. त्या तरुणाने बोरमाळ पर्समध्ये ठेवण्याचे नाटक करत हातचलाखी करून लंपास केली. काही वेळानंतर दोघेही तरुण तेथून पसार झाले. इंदलकर यांनी पर्समध्ये बोरमाळ आहे का, हे पाहिले असता बोरमाळ नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मोफत साडी मिळण्याचा माेह इंदलकर यांच्या चांगलाच अंगलट आला. या प्रकरणाचा तपास हवालदार तावरे हे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस