शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

जीपीएसह्ण बंद.. सोळा घंटागाड्यांना दंड : सातारा पालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:02 AM

घंटागाडी प्रभागात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून वारंवार केला जात होता. त्यामुळे घंटागाड्या जीपीसएस प्रणालीला जोडण्याची मागणी वारंवार केली जात होती. या मागणीला नवीन वर्षात मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देकचरा संकलनाच्या कामकाजात पारदर्शीपणा आणण्याचा प्रयत्न

सातारा : शहरातून कचरा संकलनाचे काम करणाऱ्या चाळीस घंटागाड्या पालिकेने जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) प्रणालीशी जोडल्या आहेत. या प्रणालीमुळे कचरा संकलनाच्या कामात पारदर्शीपणा येऊ लागला आहे. परंतु जीपीएस प्रणाली बंद असल्यास घंटागाडी चालकावर दंडात्मक कारवाईदेखील केली जात आहे. गेल्या चार महिन्यांत सोळा घंटागाडी चालकांवर कारवाई करून ८ हजार १०० रुपये दंड पालिकेने वसूल केला आहे.

घंटागाडी प्रभागात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून वारंवार केला जात होता. त्यामुळे घंटागाड्या जीपीसएस प्रणालीला जोडण्याची मागणी वारंवार केली जात होती. या मागणीला नवीन वर्षात मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. सातारा पालिकेच्यावतीने स्वच्छतेचा ठेका ह्ययशश्रीह्ण या खासगी कंपनीला देण्यात आला आहे. ही कंपनी चाळीस घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरात कचरा संकलनाचे काम करीत आहे.

ठेका बदलल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व चाळीस घंटागाड्या जीपीएस प्रणालीशी जोडल्या. प्रत्येक घंटागाडीवर एक चीप बसवण्यात आली आहे. तिच्या माध्यमातून दिवसभरात संबंधित घंटागाडी कुठे व कोणत्या भागात किती फिरली, एका ठिकाणी किती वेळ थांबली, कचरा संकलन करून ती डेपोपर्यंत पोहोचली की नाही, याची माहिती अधिकाऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. जीपीएस प्रणाली जर बंद असेल तर संबंधित घंटागाडीचालकाकडून प्रतिदिन १०० रुपये दंड वसूल केला जात आहे. तसेच कामगार नसल्यास १००, कचरा झाकून न नेल्यास ५०, गाडीला स्वच्छता जागृती फलक नसल्यास २५ तर घंटा नसल्यास २५ रुपये दंड आकारला जात आहे.

त्यानुसार १ जुलै ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत पालिकेच्या आरोग्य विभागाने जीपीएस बंद असलेल्या, कचरा झाकून न नेणाºया, घंटा नसलेल्या, फलक नसलेल्या एकूण सोळा घंटागाडी चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. संबंधितांकडून ८ हजार १०० रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पुढे सुरूच राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

स्वच्छ सातारा.. सुदंर साताराह्ण ही संकल्पना साकार करण्यासाठी पालिकेचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. पालिकेने घंटागाड्या जीपीएस प्रणालीशी जोडल्या आहेत. त्याचे चांगले परिणामही आता दिसू लागले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कामकाजात पारदर्शीपणा यावा, हाच या मागचा उद्देश आहे.- शंकर गोरे, मुख्याधिकारी

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसरcommissionerआयुक्त