शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बहिणीच सत्ताधाऱ्यांना जागा दाखवतील - जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 17:56 IST

आया-बहिणींना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी

सातारा : लाडकी बहीण योजनेसाठी श्रेयवाद सुरू आहे. त्यामुळे बहिणींनाच प्रश्न पडलाय की नेमकं कोठे जायचं. तिला माहीत आहे की, सख्खा भाऊ सत्तेत नसल्यामुळे यांच्याशी गोड बोलण्याशिवाय गत्यंतर नाही. खरं तर आज एकही बहीण सुरक्षित नाही. आया-बहिणींना सुरक्षा देण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे ही लाडकी बहीणच सरकारला जागा दाखवेल, असा टाेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.सातारा जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रा आल्यानंतर शाहू कला मंदिर येथे आयोजित मेळाव्यात ते बाेलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, दीपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर सरकार शरण आल्यासारखे करत आहे. त्यांच्याकडून काही हवं असेल तर हीच वेळ आहे. परंतु, फक्त घोषणा मिळतील. सरकारने मोठ्या घोषणा केल्याचा परिणाम शासनाच्या तिजोरीवर झाला आहे. २ लाख ३० हजार कोटी इतकी प्रचंड राजकोषीय तूट आहे. केलेल्या घोषणा व दिलेली कामे करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सर्व फाइल्सवर महसूल व वित्त विभाग निधी नसल्याचे लिहीत आहे.तरीही अर्थमंत्र्यांचे न ऐकता, उपमुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्री धडाधड योजना जाहीर करत आहेत. परंतु, बाणेदारपणा दाखवण्याऐवजी दोन्ही उपमुख्यमंत्री खुर्ची लाडकी असल्याने सोडायला तयार नसल्याचे पाटील यावेळी म्हणाले. दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस राजकुमार पाटील व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटलांसारखा अनुभव साताऱ्यात येईनाहर्षवर्धन पाटील यांना जो अनुभव इंदापूरला आला, त्यामुळे त्यांनी भाजप पक्ष सोडायचा निर्णय घेतला. त्यांच्यासारखा अनुभव अजून सातारकरांना येईना झालाय. तथापि, हळूहळू राज्यातील आणखी नेते खा. शरद पवार यांच्यासोबत दिसतील, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुतीWomenमहिला