शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सुटीत बाहेरगावी जाताय; स्टेटस ठेवू नका!, नाहीतर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 15:19 IST

पोलिसांकडून आवाहन

सातारा : हल्ली घरात काहीही झालं की, स्टेटसवर ठेवण्याची अनेकांना भारी हाैस असते. ही हाैस कधी सवय बनून जाते, हेही त्यांनाही समजत नाही. मात्र, अलीकडे एक नवं फॅड आलंय. सुटीसाठी कुटुंब बाहेरगावी कुठे गेलेय. किती दिवस तेथे राहणार आहे, याची सारी माहिती व फोटो स्टेटसवर ठेवले जातात; पण हाच स्टेटस पाहून इकडे त्यांचे घर साफ होते. असे अनेकदा घडले असून, सुटीत बाहेरगावी जाताना, स्टेटस ठेवू नका, असे आवाहन करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.शाळांना येत्या काही दिवसांत सुट्या लागणार आहेत. त्यामुळे अनेकजण गावी अथवा पर्यटनासाठी बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात. परंतु कुटुंबासह बाहेरगावी जाताना घराच्या सुरक्षेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बंद घरे चोरट्यांच्या ‘रडार’वर असतात. यामुळे घरफोडी, चोरी होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे असते. परंतु सर्व काही पोलिसांवर सोडून अनेक कुटुंबे निर्धास्त बाहेर फिरायला जातात. जातानाही शांततेत न जाता सोशल मीडियावर बोभाटा करत अशी कुटुंबे जातायत. यामुळे चोरट्यांना आयते कोलीत हाती सापडत आहे. काही महिन्यांपूर्वी साताऱ्यात असाच एक किस्सा घडला. एक गर्भश्रीमंत कुटुंब काश्मीरला पंधरा दिवसांसाठी फिरायला गेले होते. त्या कुटुंबाने स्टेटसवर फोटो अपलोड करून साऱ्या जगाला आपण कुठे फिरतो आहोत, ते सांगितले. त्याचा परिणाम असा झाला. त्यांच्या नात्यातील एका मुलाने त्या कुटुंबाने ठेवलेला स्टेटस पाहिला. त्याचेवळी त्याच्या डोक्यात त्यांच्या घरात चोरी करण्याचा विचार घोळू लागला. त्याने आपल्या मित्रांना सोबत घेऊन जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या नातेवाइकांच्या घरात चोरी केली. १२ तोळे सोने आणि तीन लाखांची रोकड त्याने चोरून नेली. जेव्हा ते कुटुंब परत आले. तेव्हा घरातील ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत चोरीचा छडा लावला. तेव्हा त्या कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली. रक्तातील नातेवाइकानेच आपल्या घरात चोरी केल्याने ते कुटुंब अस्वस्थ होते. परंतु यामुळे आपली इज्जत जाईल, या धास्तीने त्या कुटुंबाने त्याच्याविरोधात तक्रार देणे टाळले. त्या कुटुंबाला सोशल मीडियावर स्टेटस ठेवणं चांगलंच भोवलं. अशा प्रकारच्या घटना सध्या अनेक ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे गाजावाजा न करता आपल्या कुटुंबासह फिरण्याचा आनंद घ्या. जगाला दाखविण्यासाठी नव्हे, असं सांगण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

शेजाऱ्यांशी वादामुळे ‘ते’ राहतात तटस्थ..शेजारीच हा खरा पहारेकरी, असं पोलिसांकडून नेहमीच म्हटलं जातं. मात्र, शेजारीच आता एकमेकांचे दुश्मन बनत असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. छोट्या-मोठ्या कारणांतून शेजाऱ्यांचे एकमेकांशी मतभेद असतात. यातून त्यांचे बाेलणे भाषण नसते. यामुळे एकमेकांच्या घरात काहीही झालं तरी डोळेझाक केली जाते. त्यामुळे एखाद्याच्या घरात चोरी होत असल्याचे शेजाऱ्याला दिसले तरी तो दुर्लक्ष करून आम्ही काहीही पाहिले नाही, अशा आविर्भावात राहतो. या प्रवृत्तीमुळे पोलिसांना घरफोडीचे गुन्हे उघकीस आणताना नाकेनऊ येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस