शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात घागर फुंकून केली वायुरूपातील देवीची आराधना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 16:55 IST

वायुस्वरूपातील देवीची आराधना करून पंचमहाभुतं आनंदी ठेवण्यासाठी शहरात घागर फुंकण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.चितपावन ब्राह्मण समाजात नवरात्रोत्सवात तांदळाच्या कणकेपासून देवीचा मुखवटा तयार करून सकाळी पूजा अर्चा केली जाते.

सातारा - वायुस्वरूपातील देवीची आराधना करून पंचमहाभुतं आनंदी ठेवण्यासाठी शहरात घागर फुंकण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.चितपावन ब्राह्मण समाजात नवरात्रोत्सवात तांदळाच्या कणकेपासून देवीचा मुखवटा तयार करून सकाळी पूजा अर्चा केली जाते. जमिनीतून येणारी आणि न मरणारी वनस्पती म्हणून दुर्वांची ओळख आले. या दुर्वांचा सातू  देवीला अर्पण केला जातो. ज्ञान देणारी दुर्वा म्हणून ज्ञान स्वरूपी दुर्वाची या पुजेसाठी आवश्यक असतात. सकाळी उभ्या करण्यात आलेल्या देवीला संध्याकाळी समृध्दीचं प्रतिक असलेले रेशमी सातू वाहिले जातात. त्यानंतर महिला देवीचा जागर करतात. पितळेची घागर अग्निवर धुपवली जाते. धुपाचा धुर घागरीत साठल्यानंतर ती घागर सरळ केली जाते. त्यानंतर ही घागर दोन्ही हातांनी पकडून त्यात महिला फुंकर मारतात. घागरीतील धुर आणि फुंकर यामुळे विशिष्ट आवाजाचा नाद तयार होतो. हा नाद देवीला प्रिय असल्याचे मानले जाते.  नवविवाहित महिला हे व्रत करतात. हे व्रत पाच वर्षांचे असते.यात पहिल्या वर्षी नदीतील वाळुचा १ खडा, दुस-या वर्षी दोन खडे असे करत पाचव्या वर्षी पाच खडे आाणावे लागतात. वाळूतील खडे आणून त्यांची पूजा करणं म्हणजे जल देवतेची पुजा मानली जाते. पाचव्या वर्षी अष्टीला देवीचा तांदळाच्या पिठाच्या उकडीचा मुखवटा तयार करून देवीची पुजा बांधली जाते. पंचमहाभुंत आनंदी व प्रसन्न रहावीत, यासाठी प्रामुख्याने देवीची ही पुजा अष्टमीला करण्यात येते.

 

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७Navratriनवरात्री