शंकर देवरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST2021-07-02T04:26:21+5:302021-07-02T04:26:21+5:30

नागठाणे : प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष व येथील प्राथमिक केंद्रशाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक शंकर यशवंत देवरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात ...

Glory to Shankar Deore on his retirement | शंकर देवरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव

शंकर देवरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव

नागठाणे : प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष व येथील प्राथमिक केंद्रशाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक शंकर यशवंत देवरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, नागठाणे गावच्या सरपंच रुपाली बेंद्रे, उपसरपंच अनिल साळुंखे, कृषिभूषण मनोहर साळुंखे, बाळासाहेब साळुंखे आदींची या वेळी उपस्थिती होती.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी देवरे यांच्या शैक्षणिक, संघटनात्मक कार्याचा गोैरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. प्रदीप कदम, किरण यादव, सुभाष शेवाळे, अरुण पाटील, सुजाता जाधव, रवींद्र भंडारे, सचिन पवार, विठ्ठल फडतरे, धीरज गोळे, अनिल चव्हाण आदींची उपस्थिती होती. सविता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली मोरे यांनी आभार मानले.

Web Title: Glory to Shankar Deore on his retirement