शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पाटण तिकाटणे येथील कचऱ्याचा प्रश्न ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

कऱ्हाड : पाटण तिकाटणे परिसरात नागरिकांकडून रस्त्याकडेलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कचरा ...

कऱ्हाड : पाटण तिकाटणे परिसरात नागरिकांकडून रस्त्याकडेलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कचरा पडत असून, याबाबत संबंधित विभागाकडून काही कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येत आहे. कचऱ्यामध्ये अधूनमधून आग लागण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. मांस, अन्नपदार्थ तसेच घरगुती कचरा या ठिकाणी पडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या कचऱ्याच्या कोंडाळ्याभोवती श्वानही घुटमळत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या परिसरातून पायी प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. मोकाट श्वान नागरिकांवर हल्ला करीत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने कचरा हटवावा, अशी मागणी केली जात आहे.

राष्ट्रीय महामार्गावर रिफ्लेक्टरची मागणी

मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर दिवसेंदिवस लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर धोकादायक ठिकाणी तातडीने रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी सूचना तसेच दिशादर्शक फलक आहेत. मात्र, या फलकांना झुडपांनी वेढा घातला आहे. त्यामुळे ते चालकांच्या दृष्टीस पडत नाहीत. दुभाजकात गवत वाढल्यामुळे हे फलक असून अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत आहेत. संबंधित विभागाने रिफ्लेक्टर आणि फलक लावण्याची मागणी होत आहे.

साथरोगाची शक्यता; गावोगावी जनजागृती

कऱ्हाड : सध्या वातावरणात बदल होत असल्याने साथ रोग पसरत आहेत. या रोगांपासून बचाव करून आरोग्य जपण्याचा तसेच पाणी उकळून पिणे, नियमित औषधे घेण्याच्या सूचना डॉक्टरांकडून दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना दिल्या जात आहेत. दिवसा उकाडा व रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी पडत असल्याने सर्दी, ताप, खोकला असे आजार उद्भवत आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने सध्या हॉस्पिटलही फुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच काही गावांमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथीचे आजार पसरले आहेत. ही परिस्थिती इतर गावांत उद्भवू नये, यासाठी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याबाबत योग्य ती दक्षता घेणे गरजेचे बनले आहे.

डोंगर पठारावरील विद्यार्थ्यांचा पायी प्रवास

पाटण : पाटण तालुक्यातील काही ग्रामीण भागात आजही रस्त्याच्या सुविधा नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. या तालुक्यातील काही गावे डोंगर, जंगल क्षेत्रात असल्यामुळे तेथे दळणवळण तसेच सुविधांची कमतरता आहे. या ठिकाणी शासनाकडून आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाहीत. लोकप्रतिनिधीही मते मागण्यासाठी या विभागात जातात. त्या वेळी सुविधा पुरविण्याची पोकळ आश्वासने त्यांच्याकडून देण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात कसलीच कार्यवाही केली जात नाही. विद्यार्थ्यांचे हाल थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

कार्वे विभागामध्ये ऊसतोडींना आला वेग

कार्वे : शेरे, दुशेरे, कोरेगाव विभागातील ऊसतोडणीने वेग घेतला आहे. अनेक ठिकाणी मजुरांनी आपल्या झोपड्या घातल्या आहेत. पहाट होताच हे मजूर शिवाराचा रस्ता धरत आहेत. तसेच दिवसभर ऊसतोड करत थंडीमुळे ऊसतोड करून रात्री लवकर परतत आहेत. शिवारात ऊसतोडीची लगबग सुरू असल्यामुळे शेतकरीही सकाळी लवकर शिवारात जात असून पुढील हंगामासाठी शेतीची मशागत करण्यात ते व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.