Gambling gang in Kudal banished for one year | कुडाळमधील जुगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

कुडाळमधील जुगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

ठळक मुद्देकुडाळमधील जुगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपारतिघांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात बरेच गुन्हे दाखल

सातारा : अवैध दारू विक्री व जुगाराचा व्यवसाय चालवणाऱ्या कुडाळ, ता. जावळी येथील तीन जणांच्या टोळीला एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली.

दीपक रामचंद्र वारागडे (वय ४५, टोळी प्रमुख), सुनील गोविंद गावडे (वय ३२) प्रवीण रामचंद्र वारागडे (वय ४४, सर्व रा. कुडाळ, ता. जावळी) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या तिघांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात चोरटी दारू विक्री आणि अवैध जुगाराचे बरेच गुन्हे दाखल आहेत.

वारंवार त्यांना सुधारण्याची संधी देण्यात आली. मात्र, तरीही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्यामुळे मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी निळकंठ राठोड, पोलीस हवालदार संजय शिर्के, पोलीस कॉन्स्टेबल संजय काळे यांनी या तीन जणांच्या टोळीला सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे सादर केला होता. त्या प्रस्तावावर सुनावणी होऊन या तीन जणांच्या टोळीला एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

Web Title: Gambling gang in Kudal banished for one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.