शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही - देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 11:59 IST

आंधळी धरणात जिहे-कठापूर योजनेच्या पाण्याचे पूजन

सातारा : तारळी, धोम, बलकवडी, टेंभू, म्हैसाळ, नीरा-देवधर या प्रकल्पांवरील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सर्व योजना मोठ्या प्रमाणावर गतीने पूर्ण करण्यात येतील. गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात १२१ कामांना मंजुरी दिली आहे. यातून महाराष्ट्रातील १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.माण तालुक्यातील आंधळी धरणावरील गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे-कठापूर)चे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कूल, माजी आमदार दिलीप येळगावकर, मदन भोसले, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता पुणे हनुमंत गुनाले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सातारा सिंचन मंडळ अधीक्षक अभियंता अरुण नाईक, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फडणवीस म्हणाले, ‘अनेक दशके थेंब-थेंब पाण्यासाठी व्याकूळ असणाऱ्या भूमीत जलपूजन करण्याची संधी मिळाली आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. माण-खटाव तालुक्यांतील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी जिहे-कठापूर योजनेला फेरमान्यता देण्यात आली आहे. त्यातून माण तालुक्यातील २७ गावे व खटाव तालुक्यातील ४० गावी, अशी एकूण ६७ गावे व त्यातील १ लाख ७५ हजार ८०३ लाभधारकांसाठी या पाण्याचा वापर होणार आहे. यातून २७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.या योजनेसाठी जवळपास १,३३१ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दुष्काळी भागापर्यंत कशाप्रकारे पाणी पोहोचू शकते, याचे मोठे मॉडेल तयार झाले आहे. जे पाणी वाहून जाते ते वाचविण्यासाठी बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे राज्यभरात आठ टीएमसी पाण्याचे फेरवाटप करून दुष्काळी भागाला ते उपलब्ध करून देऊ शकलो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळWaterपाणी