शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भागीदारीचे आमिष दाखवून फसवणूक; कऱ्हाडच्या चांदी व्यावसायिकाला ९० लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 12:18 IST

सांगली जिल्ह्यातील सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल

कऱ्हाड : भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला तब्बल ९० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांवर शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज विष्णू साळुंखे (रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.नवीनकुमार सावंत व महेशकुमार सावंत (रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडातील मंगळवार पेठेत राहणारे सुरज साळुंखे हे चांदीचा व्यवसाय करतात. व्यवसायानिमित्त ते आंध्र प्रदेशमध्ये गेले असताना त्याठिकाणी त्यांची भिकवडी येथील नवीन सावंत याच्याशी ओळख झाली. त्यानंतर नवीन याने सुरज यांना कऱ्हाडात दुकान सुरू करणार असल्याचे सांगून पैशाची मागणी केली. तसेच भागीदारीत व्यवसाय सुरू करू, असेही सांगितले. त्यामुळे सुरज यांनी याबाबत नवीन याचा भाऊ महेश याच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर सोन्याचे दागिने गहाण ठेवून १५ लाख तसेच स्वत:जवळील १५ लाख असे ३० लाख रुपये सुरज यांनी नवीनला दिले. १६ जानेवारी २०२२ रोजी हा व्यवहार झाला. त्यानंतर महेश व नवीन दोघेही सुरज यांच्या कऱ्हाडातील दुकानात आले. त्यावेळी सुरज यांनी चांदीबाबत विचारणा केली. मात्र, चांदीसाठी आणखी दहा लाख रुपयांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार सुरज यांनी दहा लाख रुपये दिले. त्याबरोबरच जास्तीत जास्त चांदी आणायची असेल तर आणखी तीस लाख रुपयांची जुळणी कर, असे ते दोघे म्हणाले. त्यामुळे सुरज यांनी त्यांच्या मित्राकडून आणखी तीस लाख रुपये घेऊन नवीन आणि महेश या दोघांना दिले. त्यानंतर आणखी दहा लाख रुपये नवीनच्या बँक खात्यावर भरण्यात आले.

६ सप्टेंबर २०२१ पासून आजअखेर सुरज साळुंखे यांनी नवीन व त्याचा भाऊ महेश या दोघांना एकूण ९० लाख रुपये दिले. मात्र, एवढे पैसे देऊनही त्या दोघांनी सुरज यांना चांदी आणून दिली नाही. तसेच भागीदारीत व्यवसायही सुरू केला नाही. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरज साळुंखे यांनी याबाबतची फिर्याद कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत.

एक एकर जमिनीचे आश्वासननवीन व महेश हे दोघेजण चांदी आणून देत नाहीत. तसेच आपण दिलेले पैसेही परत देत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर सुरज साळुंखे यांनी त्यांच्यामागे पैशासाठी तगादा लावला. त्या दोघांची भेट घेण्यासाठी सुरज भिकवडी येथे त्यांच्या घरी गेले. त्यावेळी दोघांनीही आमच्याकडे पैसे नाहीत. आमच्या नावावर असलेली एक एकर जमीन आम्ही तुझ्या नावावर करून देतो, असे आश्वासन सुरज यांना दिले होते. मात्र, त्या दोघांनी पैसे दिले नाहीत. तसेच जमीनही नावावर करून दिली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस