गज्या मारणे टोळीशी संबंधित चौदा जण वाई पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 06:42 PM2021-04-30T18:42:19+5:302021-04-30T18:43:22+5:30

CoronaVirus Crime Wai Satara : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व जण पैसे वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यातील काही जणांचा पुण्यातील गज्या मारणे टोळीशी संबंध असल्याचे समजल्याने त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Fourteen members of the Gajya Marane gang have been arrested by the Wai police | गज्या मारणे टोळीशी संबंधित चौदा जण वाई पोलिसांच्या ताब्यात

गज्या मारणे टोळीशी संबंधित चौदा जण वाई पोलिसांच्या ताब्यात

Next
ठळक मुद्देगज्या मारणे टोळीशी संबंधित चौदा जण वाई पोलिसांच्या ताब्यातपोलीस कसून चौकशी करत आहेत

वाई : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाईपोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व जण पैसे वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यातील काही जणांचा पुण्यातील गज्या मारणे टोळीशी संबंध असल्याचे समजल्याने त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.

राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी भीमनगर तिकटण्याच्या तपासणी नाक्यावर दुपारी ताब्यात घेतले. हे सर्वजण पाचगणी व वाई येथील दोघांकडे पैशांच्या वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले. या प्रकरणात संबंधितांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरु होते. उशिरापर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नव्हती.

वाई येथील बिल्डर व पाचगणी येथील एका शाळेच्या चालकाशी संबंधित पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारातील वसुलीसाठी पुण्यातील हे चौदा जण तीन मोटारीतून वाईला आले होते. पाचगणी येथे जाऊन व नंतर वाईत एकाच्या घरी जाऊन पुणे - महाबळेश्वर रस्त्यावरील वाई भीमनगर तिकाटण्यातील तपासणी नाक्यावर त्यांच्या गाड्या अडविण्यात आल्या.

पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व कर्मचाऱ्यांनी त्यांना वाई पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आली आहे. त्यांच्याकडून दप्तर अहवाल मागविण्यात आला आहे. या चौदा जणातील अनेक जण गज्या मारणे टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून समजली.

उशिरा पर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता व त्यांना अटकही करण्यात आली नव्हती. पोलिसांनी संबंधित बिल्डर व पाचगणीतील शाळा चालकालाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. या दोघानी संबंधित चौदा जणांविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे तोंडी सांगितल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान पोलीस पुण्यातील अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याने उशिरापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.मात्र त्यांच्यावर जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलीस दाखल करणार आहेत व नंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Fourteen members of the Gajya Marane gang have been arrested by the Wai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.