शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Satara: नववीच्या मुलांनी काढली विद्यार्थिनीची छेड, कऱ्हाड तालुक्यातील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 12:33 IST

चार मुलांविरोधात तक्रार दाखल

कऱ्हाड : तालुक्यातील एका शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी त्याच शाळेत दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित मुलीच्या तक्रारीवरून कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली असून अल्पवयीन असल्याने संबंधित मुलांना सातारा येथील बाल न्याय मंडळ येथे समुपदेशनकामी पाठविले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.तक्रारदार अल्पवयीन मुलगी ही एका शाळेत दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. १३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता संबंधित मुलगी व तिची मैत्री शाळेसमोरून जात असताना त्याच शाळेतील नववीमध्ये शिकणाऱ्या चार अल्पवयीन मुलांनी तिची छेड काढली. त्यानंतर या घटनेची माहिती संबंधित मुलीने शिक्षकांना दिली. तसेच हा प्रकार शिक्षकांनी स्वत: पाहिला होता. हा प्रकार घडण्यापूर्वी गत महिन्यात संबंधित मुलांनी शाळेतून घरी जात असताना पाठीमागून येत जोरजोरात हाका मारून संबंधित मुलीची छेड काढली होती. हा प्रकारही त्या मुलीने शिक्षकांना सांगितला होता, असे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, ज्या मुलांविरोधात तक्रार करण्यात आली ती सर्व मुले अल्पवयीन आहेत. संबंधित गुन्हा साध्या प्रकारातील असून त्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे. महाराष्ट्र राज्य बाल न्याय अधिनियम २०१८ अन्वये याप्रकरणी गुन्हा दाखल न करता स्टेशन डायरी नोंद घेऊन संबंधित मुलांना समुपदेशनसाठी सातारा येथील बालन्याय मंडळात पाठवले जाणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारी