शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील सराईत गुन्हेगारांकडून चार पिस्तूल, काडतूसे जप्त; सातारा पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 18:44 IST

एक ताब्यात, एक जण झाला पसार

मुराद पटेलशिरवळ: शिंदेवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत पुण्यातील सराईत गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे चार पिस्तूल व चार जिवंत काडतूसे असा २ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित गुन्हेगार पिस्तूल विक्रीसाठी आले असता सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली.याप्रकरणी शुभम ऊर्फ सोनू अनिल शिंदे (वय २४, रा. महर्षीनगर, स्वारगेट, पुणे) याला अटक करीत शिरवळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर घटनास्थळावरुन दिग्विजय  ऊर्फ सनी देसाई (रा. सिंहगड कॅम्पस, पुणे) याने पोबारा केला. पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली.  सराईत गुन्हेगार शुभम ऊर्फ सोनू अनिल शिंदे व त्याचा साथीदार दिग्विजय ऊर्फ सनी देसाई हे शिंदेवाडी (ता. खंडाळा)गावच्या हद्दीतील एका कंपनीच्या कंपाउंडजवळ देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान, दोन व्यक्ती दुचाकीवरून येताना दिसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी शिताफीने खाली ओढत ताब्यात घेतले. माञ, दुचाकीचालक पळून जाण्यात यशस्वी झाला.ताब्यात घेतलेल्याची अंगझडती घेतली असता देशी बनावटीची ४ पिस्तूल व ४ जिवंत काडतुसे मिळून २ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अंमलदार लक्ष्मण जगधने, अरुण पाटील, शिवाजी भिसे, सचिन ससाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस अंमलदार अरुण पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिद हे अधिक तपास करीत आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPuneपुणे