शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी-दुचाकी अपघातात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 16:27 IST

तांबवेजवळील पवारमळा परिसरात मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. तर दोन मुली जखमी झाल्या.

ठळक मुद्देचारचाकी-दुचाकी अपघातात युवक ठारतांबवे-पवारमळा येथील घटना : दोन मुली जखमी

तांबवे : तांबवेजवळील पवारमळा परिसरात मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. तर दोन मुली जखमी झाल्या.प्रतीक शंकर शिंदे (वय १९, रा. वसंतगड, ता. कऱ्हाड ) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर प्रतीक्षा शंकर शिंदे (वय १४, रा. वसंगतड, ता. कऱ्हाड ) व गुड्डी चंद्रकांत चव्हाण (वय १०, रा. वारुंजी, ता. कऱ्हाड ) या दोघी जखमी झाल्या. यातील प्रतीक्षा शिंदे ही गंभीर जखमी झाल्याने तिला कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गुड्डी शिंदे ही किरकोळ जखमी झाली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चालक सूरज कृष्णात गुरव हे आपली पिकअप गाडी (एमएच ०४ ई ९४३८) ही घेऊन तांबवेमार्गे घारेवाडीच्या दिशेने निघाले होते. यादरम्यान, ते तांबवे पुलाजवळील पवारमळा येथे आले असता रस्त्यावर समोरून दुचाकी (एमएच ११ टीके २५) यावरून प्रतीक, प्रतीक्षा व गुड्डी हे तांबवेहून वसंतगडच्या दिशेने निघाले होते.

पवारमळा येथे ते आले असता रिक्षाला ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरून येणारी पिकअप गाडी न दिसल्याने त्याला समोर धडक बसली. यामध्ये प्रतीक शिंदे हा जागीच ठार झाला. याबाबतची माहिती तांबवे पोलीस पाटील पवन गुरव यांनी दिली. अपघात घडताच त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर