महाबळेश्वर येथे भीषण आगीत चार झोपड्या खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 15:35 IST2018-12-14T15:34:33+5:302018-12-14T15:35:40+5:30

महाबळेश्वर येथील प्राथमिक शाळेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या चार झोपड्यांना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता अचानक भीषण आग लागली. या आगीत सर्व झोपड्या जळून खाक झाल्या असून, संसारोपयोगी साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

Four huts of a giant fire in Mahabaleshwar | महाबळेश्वर येथे भीषण आगीत चार झोपड्या खाक

महाबळेश्वर येथे भीषण आगीत चार झोपड्या खाक

ठळक मुद्देमहाबळेश्वर येथे भीषण आगीत चार झोपड्या खाकआणखी वीस झोपड्या आगीपासून बचावल्या

महाबळेश्वर : येथील प्राथमिक शाळेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या चार झोपड्यांना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता अचानक भीषण आग लागली. या आगीत सर्व झोपड्या जळून खाक झाल्या असून, संसारोपयोगी साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर येथील प्राथमिक शाळेच्या पाठीमागील बाजूस मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. या झोपड्यांमधील एका झोपडीला आग लागली. याची झळ इतर तीन झोपड्यांना लागल्याने एका पाठोपाठ एक झोपड्या जळून खाक झाल्या.

हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी तसेच अग्निशामक दलानेही धाव घेतली. मात्र, तोपर्यंत चारीही झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

वेळीच आग आटोक्यात आल्याने आणखी वीस झोपड्या आगीपासून बचावल्या. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Four huts of a giant fire in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.