खळबळजनक! साताऱ्यात एकाच घरात आढळले चार मृतदेह; आई-वडील, भाऊ, बहिणीचा समावेश

By दीपक शिंदे | Updated: July 21, 2023 13:42 IST2023-07-21T13:27:23+5:302023-07-21T13:42:08+5:30

साताऱ्यातील या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपास सुरू केला आहे.

Four dead bodies found in one house in Satara; Including father, son, mother, daughter | खळबळजनक! साताऱ्यात एकाच घरात आढळले चार मृतदेह; आई-वडील, भाऊ, बहिणीचा समावेश

खळबळजनक! साताऱ्यात एकाच घरात आढळले चार मृतदेह; आई-वडील, भाऊ, बहिणीचा समावेश

सातारा - पाटण तालुक्यातील सणबुर येथे गुरुवारी रात्री एकाच कुटुंबातील चार जण राहत्या घरी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण ढेबेवाडी विभाग हादरला आहे. या एकाच कुटुंबातील व्यक्तींची आत्महत्येची अन्य कारण याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून तपासाअंती त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सणबुर ता. पाटण येथील आनंदा पांडुरंग जाधव (वय ७५), पत्नी सुनंदा आनंदा जाधव (वय ६५) ,मुलगा संतोष आनंदा जाधव (वय ४५ ) व विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस राहणार मंद्रुळकोळे ता.पाटण हे चार जण झोपलेले स्थितीत मयत आढळून आले.

काही दिवसापासून आनंद जाधव हे आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांना कृष्णा हॉस्पिटल कराड येथे हलवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांना तिथून घरी सोडण्यात आले. रात्री सणबूर येथील राहत्या घरी त्यांना ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली होती. लाईट नसलेमुळे जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती.

आजारी व्यक्ती सोबत पत्नी, मुलगा व मुलगी व ते स्वतः असे चौघेजण या ठिकाणी होते. विवाहित मुलगी पुष्पलता धस यांच्या मुलाने रात्री फोनवरून संपर्क साधून आजोबांच्या तब्येतीची विचारपूस केली. सणबुर मधील घटना घडली ते घर एका आड बाजूला आहे .पुन्हा शुक्रवारी सकाळी त्याने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणी फोन उचलत नसल्याने शेजारील व्यक्तींना संपर्क करून घरी विचारपूस करण्यास सांगितले काही लोक घरी गेले असता त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र आतून दरवाजा बंद होता व कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजाची कडी तोडून आत पाहिले असता चारी जण अंथरुणावर मृत अवस्थेत पडलेले दिसले.

Web Title: Four dead bodies found in one house in Satara; Including father, son, mother, daughter