Satara Politics: कराडमधील आदर्श गावच्या माजी सरपंचांनाही 'कमळा'ची भुरळ! 

By प्रमोद सुकरे | Updated: May 28, 2025 17:32 IST2025-05-28T17:32:28+5:302025-05-28T17:32:46+5:30

आता जखिणवाडीचे उद्योजक नरेंद्र पाटीलही आमदार भोसलेंच्या गळाला

Former Sarpanch of Jakhinwadi in Karad Narendra Patil to join BJP | Satara Politics: कराडमधील आदर्श गावच्या माजी सरपंचांनाही 'कमळा'ची भुरळ! 

Satara Politics: कराडमधील आदर्श गावच्या माजी सरपंचांनाही 'कमळा'ची भुरळ! 

प्रमोद सुकरे 

कराड : कराड दक्षिणेत सत्तांतराचे 'कमळ' फुलल्यापासून अनेकांना या 'कमळा'ची भुरळ पडू लागली आहे. गेल्या २/४ महिन्यात अनेकांनी 'हात' सोडत 'कमळा'ला पसंती दिली आहे. आता आदर्श गाव म्हणून ओळख असणाऱ्या जखिणवाडीच्या माजी सरपंचांनाही या 'कमळा'ची भुरळ पडली असून काही दिवसात उद्योजक नरेंद्र पाटील आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या गळाला लागणार असे खात्रीशीर समजते.

कराड दक्षिण मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. दिवंगत यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील या मंडळींनी या मतदारसंघाचे प्रदिर्घकाळ नेतृत्व केले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या मतदारसंघाचे नेतृत्व केले. पण गत विधानसभा निवडणुकी हा मतदारसंघ त्यांच्या 'हाता'ला लागला नाही.

विधानसभेतील विजयानंतरही डॉ.अतुल भोसले स्वस्थ बसलेले नाहीत.त्यांनी मतदारसंघात भाजपची पाळेमुळे अधिक रुजवण्यासाठी व्ह्यूरचना सुरू ठेवल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी विरोधकांच्या गोटातील काही 'मोहरे' लक्ष करीत ते आपल्या कंपुत घेतले आहेत.नरेंद्र पाटील यांना टाकलेला गळ हा त्याचाच एक भाग मानावा लागेल. या बदलत्या भूमिकेने वारुंजी जिल्हा परिषद गटातील समीकरणे बदलली तर आश्चर्य वाटायला नको.

मिनी विधानसभेची तयारी

डॉ.अतुल भोसलेंनी विधानसभा जिंकली. त्यांना मिनी विधानसभा जिंकायची आहे.आतातर ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तसेच तालुक्यातील पुढचे राजकारण सोयीची करायचे असेल तर पंचायत समिती, नगरपालिका येथे त्यांना भाजपची सत्ता आणावी लागेल. त्यामुळेच बेरजेचे राजकारण सुरू आहे.

त्यांच्यावर आहे डोळा ..

तालुक्यात यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांचा मोठा गट होता. या दोन भावांच्यात फूट पडली. दोन गट तयार झाले. याच जुन्या गटाच्या कार्यकर्त्यांवर डॉ. अतुल भोसले यांचा डोळा आहे. 

अशी आहे राजकीय पार्श्वभूमी

अँड.नरेंद्र पाटील यांचे कुटुंब मोहिते- भोसले परिवाराशी निगडित राहिले आहे. त्यांचे आजोबा कृष्णाजी नांगरे- पाटील हे लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते. वडील धोंडीराम नागरे पाटील हे भूविकास बँकेचे व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष होते.यशवंतराव चव्हाणांच्या सांगण्यावरुन यशवंतराव मोहितेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. १९८९ पर्यंत कृष्णा उद्योग समूहाच्या विविध संस्थांवर संचालक म्हणून ते कार्यरत होते. त्यांचे चुलते रामराव पाटील हे यशवंतराव मोहिते पतसंस्थेचे अध्यक्ष होते. सन २००७ साली मोहिते भोसले कुटुंबीयांचे जे मनोमिलन घडून आले त्यात नरेंद्र पाटलांची भूमिका महत्त्वाची होती.ते जखिणवाडी ग्रामपंचायतीत सरपंच होते. त्यांनी गावाला शासनाचे अनेक पुरस्कार मिळवले. 

त्याचं काय करणार? 

नरेंद्र पाटील यांच्या कुटुंबियांचे काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्याशीही जवळचे नाते आहे. नरेंद्र पाटील अनेक वर्षापासून सागरेश्वर सुतगिरणीचे संचालक आहेत. त्यामुळे राजकीय भूमिका बदलताना त्यांना कदमांचाही कौल घ्यावा लागेल असे बोलले जाते. 

राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे.आपणही भाजपमध्ये प्रवेश करूया अशा भावना कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केल्या आहेत. निर्णय घ्यावा असा त्यांचा दबाव आहे. -  अँड.नरेंद्र पाटील माजी सरपंच,जखिणवाडी 

Web Title: Former Sarpanch of Jakhinwadi in Karad Narendra Patil to join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.