साहिल शहाकोरेगाव : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात वेगवेगळ्या पक्षात असलेल्या आजी-माजी पालकमंत्र्यांनी एकत्र येत भाजपविरोधात भक्कम आघाडी उभारल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कराड, फलटण आणि इतर नगरपालिकांच्या निवडणुकीत या संयुक्त रणनीतीचे प्रकर्षाने दर्शन घडत आहे.सातारा जिल्ह्यात पालकमंत्री पदाला नेहमीच विशेष महत्त्व राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे पद सांभाळल्यानंतर या पदाचे राजकीय वजन आणखी वाढले. त्यानंतर आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार व सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील आणि महायुती सरकारमधील पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही जिल्ह्यात आपली ठसठशीत छाप पाडली. विशेष म्हणजे, पक्ष वेगळे असले तरी या नेत्यांमध्ये कायमच समन्वय राहिल्याचे विविध निवडणुकांमधून दिसून आले आहे.कराड नगरपालिका निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. अतुल भोसले यांना रोखण्यासाठी यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडी एकत्र आली असून, शनिवारी त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झाला. तर फलटणमध्ये भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकवटले असून, त्या आघाडीचे नेतृत्वदेखील देसाई स्वतः करत आहेत. रविवारी त्यांनी फलटणमधील राजे गटाच्या प्रचाराचा शुभारंभ केला.
विरोधी आघाड्या पूर्वीपेक्षा अधिक संघटित...जिल्हाभर भाजपला रोखण्यासाठी आजी-माजी पालकमंत्र्यांनी अक्षरशः जिल्हा पिंजून काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी कराड शहराचा विकास हाच आमचा एकमेव अजेंडा. एकजुटीने मैदानात उतरून पुढील वाटचाल ठरवली आहे, असे स्पष्ट केले. एकूणच, साताऱ्यातील विरोधी आघाड्या पूर्वीपेक्षा अधिक संघटित होत असून, भाजपसाठी या निवडणुकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Web Summary : Satara's ex and current guardian ministers form alliance against BJP in municipal elections. They aim to thwart BJP leaders in Karad and Phaltan, presenting a united front. This has intensified the political competition in the district.
Web Summary : सतारा के पूर्व और वर्तमान पालक मंत्री नगर पालिका चुनावों में भाजपा के खिलाफ गठबंधन बनाते हैं। उनका लक्ष्य कराड और फलटण में भाजपा नेताओं को रोकना, एक संयुक्त मोर्चा पेश करना है। इससे जिले में राजनीतिक प्रतिस्पर्धा तेज हो गई है।