मान्सूनपूर्व कामांचा अधिकाऱ्यांना विसर--: वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:54 AM2019-06-06T00:54:52+5:302019-06-06T00:55:36+5:30

पावसाळा जवळ आला की वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली जाते. वीजवाहक तारांवर आलेल्या उंच वृक्षांवरील फांद्या हटविणे, डीपी बॉक्सची तपासणी करणे, अशी कामे कर्मचाºयांकडून केली जातात.

Forget about non-monsoon employees: - Ignore the power distribution workers | मान्सूनपूर्व कामांचा अधिकाऱ्यांना विसर--: वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष

मान्सूनपूर्व कामांचा अधिकाऱ्यांना विसर--: वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देपाटण तालुका ; नागरिक तसेच ग्रामस्थांतून संताप

पाटण : पावसाळा जवळ आला की वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली जाते. वीजवाहक तारांवर आलेल्या उंच वृक्षांवरील फांद्या हटविणे, डीपी बॉक्सची तपासणी करणे, अशी कामे कर्मचाºयांकडून केली जातात. सध्या पाटण तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होत असून, या वातावरण बदलामुळे मान्सूनचे लवकर आगमन होईल, असे चित्र दिसत आहे. मान्सून जवळ आला तरी तालुक्यातील वीज वितरणच्या अधिकाºयांना या मान्सूनपूर्व कामांचा विसर पडलेला दिसत आहे.

तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वीजवाहक तारा तुटल्याने अनेक मुक्या प्राण्यांचे जीव गेले आहेत. याबरोबरच वीजवाहक तार ऊस किंवा पिकांमध्ये तुटून पडल्याचेदेखील प्रकार घडले होते. यातून वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोणताच बोध घेतल्याचे दिसत नाही.पावसाळ्यामध्ये विजेसंदर्भात अनेक समस्या निर्माण होत असतात़ त्यामुळे वीज वितरण कंपनीला मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे असते.

पाटण तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वीजवाहक तारा तुटल्याने शेतकरी तसेच मुक्या प्राण्यांचे जीव जाण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. यातून वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोणताच बोध घेतल्याचे दिसत नाही. तसेच विद्युत डीपीला साधा पत्रादेखील लावण्याचे औदार्य वीजवितरण कंपनी दाखवित नाही.
परिणामी ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील आणि शहरात पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे.

तालुक्यातील या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने गांभीर्यपूर्वक विचार करून कामे पूर्ण करणे गरजेची आहेत. तसेच तालुक्यातील उघड्या असणाºया डीपीला पावसाळा सुरू होण्यापूर्वी दरवाजे बसविण्यात यावेत. अन्यथा कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो, याची काळजी अधिकारी आणि कर्मचाºयांनी घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

अधिकाºयांकडून उपाययोजनांकडे दुर्लक्ष
तालुक्यातील गावांमधील उघड्या डीपी बॉक्सबाबत अधिकाºयांना ग्रामस्थांनी विचारणा केल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे डीपीच्या दरवाजाची मागणी केली आहे. दरवाजे आले की ते बसविण्यात येतील, अशा प्रकारची उत्तरे पाटण तालुक्यातील लोकांना अधिकारी आणि कर्मचाºयांकडून ऐकायला मिळत आहेत. मात्र, याबाबत ठोस उपाय त्यांच्याकडून केले जात नाहीत.
 

अधिकाºयांची मनमानी; जनता त्रस्त
पाटण तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या आणि त्यांचा उपविभागीय कार्यालयाच्या अधिकाºयांवर तालुक्यातील लोकप्रतिनिधींचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे अधिकाºयांकडून मनमानी कारभार केला जात आहे. यास तालुक्यातील जनता वैतागली आहे. जवळपास रोजच सर्व उपकेंद्रातील फिडवर ब्रेकडाऊन घेतला जात आहे. त्यामुळे शेतीला देखील वेळेत पाणी मिळत नाही़

डीपी बॉक्सही उघडे
ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील आणि शहरात पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे़ तालुक्यातील पाटण शहर, मोरणा, कोयना, केरा, मरळी विभागात बरेच डीपी उघडे आहेत. याकडे लक्ष देऊन संबंधित विभागाने बॉक्सला दरवाजे बसवून घेणे गरजेचे आहे.

हे होत नाही
लाईन पेट्रोलिंग करणे गरजेचे आहे.
उघडे असलेले डीपी बॉक्स बंद करणे
जंप बदलणे, वीज तारांवरील पावडर काढणे
इन्सुलेटर बदलने
जमिनीपासून उंचीवर वीजवाहक तारा ओढणे

Web Title: Forget about non-monsoon employees: - Ignore the power distribution workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.