शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

Satara: कासची फुले बहरण्यास अजून अवधी!, पर्यटन शुल्कात वाढ, मोजावे लागणार 'इतके' रुपये

By दीपक शिंदे | Published: August 16, 2023 2:12 PM

सध्या पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी फुलांचा बहर

पेट्री : जागतिक वारसास्थळ व विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुलांचा सडा बहरण्यास अजून अवधी असून, कासवर खरी रंगाची उधळण १ सप्टेंबर नंतरच पाहायला मिळणार आहे.कास पठारावरील फुले पाहण्यासाठी गतवर्षी शंभर रुपये शुल्क होते. दरम्यान पार्किंग शुल्क व पार्किंगवरून पठारावर येण्यासाठी वेगळे शुल्क आकारले जात होते. परंतु यावर्षीसाठी पार्किंग शुल्क, पार्किंगवरून पठारावर येण्यासाठी असणाऱ्या बसचे शुल्क व पर्यटन शुल्क असे एकत्रित प्रतिव्यक्ती १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. याबाबतचा निर्णय कास पठार कार्यकारी समितीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आल्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय कीर्दत यांनी सांगितले.सध्या पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी ही फुले बहरत असून पांढरे चेंडूच्या आकाराचे गेंद फूलही दिसू लागले आहे. पावसाचे प्रमाण कमी होऊन उन्हाची ताप पडली तरच विविधरंगी फुलांचा बहर येण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता सध्यातरी दिसत आहे.कास पठार कार्यकारी समितीमार्फत सद्य:स्थितीत पठारावर असणारे मंडप गुहा, भदारतळ, कास तलाव व्ह्यू पाॅइंटला पर्यटकांना पन्नास रुपये शुल्क आकारून प्रवेश दिला जात आहे. कास पठारावर फुलांची संख्या कमी झाल्याने अभ्यासकांच्या अभिप्रायानुसार पठाराला असणारी लोखंडी जाळी यावर्षी उन्हाळ्यात काढण्यात आली. पर्यटक फुलांच्या क्षेत्रात कसेही प्रवेश करत असल्याने सध्या पठारावर समितीच्यावतीने फुलांच्या भागाचे संरक्षण करण्यासाठी तात्पुरती तंगुसाची जाळी बसवण्यात आली आहे.कास परिसरात सध्या हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत असून दाट धुके, रिमझिम पाऊस, अंगाला झोंबणारा गार वारा वातावरण आहे. विकेंड, १५ ऑगस्टमुळे पर्यटकांची चांगलीच रेलचेल असून पर्यटक पावसाचा आनंद लुटत आहेत.धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी भारतातील सर्वात उंच वजराई धबधबा, एकीवचा धबधबा येथे पर्यटकांची चांगलीच गर्दी होत असून, पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यास धबधब्यांचा हंगाम वाढू शकतो.

पठारावर फुलांचा हंगाम अगदी तोंडावर असून, कास पठार कार्यकारी समिती मार्फत पर्यटकांना सुलभ पर्यटन होण्यासाठी विविध सुविधा पुरविण्याबाबत तयारी सुरू आहे. १ सप्टेंबरपासून फुलांची परिस्थिती पाहून शुल्क आकारणी करून हंगाम सुरू करण्यात येईल. -दत्ता किर्दत, उपाध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारtourismपर्यटन