शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पहिल्याच पावसात महिंद धरण भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 3:06 PM

Rain Dam Satara : ढेबेवाडी विभागातील वांग नदीवरील महिंद धरण ओव्हर फ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.

ठळक मुद्देपहिल्याच पावसात महिंद धरण भरलेशेतकऱ्यांत समाधान : सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू

सणबूर : ढेबेवाडी विभागातील वांग नदीवरील महिंद धरण ओव्हर फ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.ढेबेवाडीपासून सुमारे दहा किलोमीटरवरील महिंद गावाजवळ बांधलेल्या धरणाला चांगली नैसर्गिक अनुकूलता लाभली आहे. डोंगरातून, नदी, नाले व ओढ्यातून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पाण्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच धरण ओव्हर फ्लो होते. ढेबेवाडी खोऱ्यातील अनेक गावांच्या शेती व पिण्याच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न या धरणामुळे सुटला असून पावसाळ्यात धरण भरतेय कधी? याकडेच येथील जनतेचे लक्ष लागलेले असते.

८५ दशलक्ष घनफुट क्षमतेच्या महिंद धरणाचे पाणलोट क्षेत्र ३५.९८ चौरस किलोमीटरचे असून ३६२ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. गतवर्षी आणि यंदाही मान्सुनपूर्वी झालेल्या वादळी पावसाने धरण भरायला बराच हातभार लागला. परिणामी, सलग दुसऱ्याही वर्षी ते लवकर भरले आहे.

धरणाच्या १०४ मीटरच्या मुक्तपतन पद्धतीच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. मध्यंतरी धरणाच्या दगडी सांडव्याची पडझड झाल्याने धरणाला धोका निर्माण झालेला होता. मात्र, पाटबंधारे विभागाच्या मार्गदर्शनाखाली महेश पाटील कंपनीने यशस्वी जॅकेटिंग केल्याने तो धोका कमी झाला आहे.गत २१ वर्षात धरणात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्यासाठी वारंवार नियोजन केले जात असले तरी अद्याप गाळ निघालेलाच नाही. सध्या धरण ओसंडून वाहत असले तरी त्या परिसरात ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून ये-जा करू नये. पोलिसांचे त्या परिसरात नियमित पेट्रोलिंग सुरू आहे. जीव धोक्यात घालून धरण परिसरात जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरणSatara areaसातारा परिसर