साताऱ्यात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पूर्व वैमनस्यातून घटना; जखमीवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 00:50 IST2022-11-10T00:49:26+5:302022-11-10T00:50:50+5:30
खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्या पोटात अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या.

साताऱ्यात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पूर्व वैमनस्यातून घटना; जखमीवर उपचार सुरू
सातारा:
येथील राजवाड्यावर रात्री अकराच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्या पोटात अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये मांढरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी राजवाडा परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. हा वाद पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील राजवाडा परिसरामध्ये खासदार उदयनराजे समर्थक आप्पा मांढरे हे बोलत उभे राहिले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या पोटात लागल्या आहेत.
या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलीस व सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी मांढरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजवाडा जवळील गोल बागेजवळ ही घटना घडली असून तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी तातडीने हाती घेतले आहे. मारेकर्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सातारा शहराची नाकाबंदी सुद्धा केली आहे.