शिरवळ येथे गोळीबार, एक युवक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 22:50 IST2025-09-16T22:48:58+5:302025-09-16T22:50:06+5:30

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.

firing in shirwal satara and one youth injured | शिरवळ येथे गोळीबार, एक युवक जखमी

शिरवळ येथे गोळीबार, एक युवक जखमी

शिरवळ: मुराद पटेल(फोटो मेल) खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील शासकीय विश्रामगृह समोर असणाऱ्या मेनरोडवर पूर्ववैमनस्यातून भरदिवसा एका 40 वर्षीय युवकावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.यामध्ये रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख (वय 40,रा.व्हाईट हाऊस,बाजारपेठ,शिरवळ ता.खंडाळा) असे गोळीबारात किरकोळ जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

दरम्यान,हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर दुचाकीवरून पलायन केले आहे. हि घटना मंगळवार दि.16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.12 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ ता.खंडाळा येथील रियाज उर्फ मिन्या शेख हा शिरवळ येथे बाजारपेठ याठिकाणी कुटुंबियांसमवेत राहण्याकरिता आहे.दरम्यान,रियाज उर्फ मिन्या शेख हा मंगळवार दि.16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान मेनरोडवर असणाऱ्या शासकीय विश्रामगृह याठिकाणी दुचाकी (क्रं-एमएच-12-टीई-4498)वरून उतरत एका मित्राशी बोलत होते. सायंकाळी 5.12 वाजण्याच्या दरम्यान बाजारपेठमधून दुचाकीवरून आलेल्या दोन हळखोरांपैकी एक युवक उतरत मिन्या उर्फ रियाज शेख यांच्या दिशेने आला. अचानकपणे गोळीबार करत असताना मिन्या उर्फ रियाज शेख याने पाहिल्यानंतर हल्लेखोर युवकाबरोबर झटापट झाली. गोळी सुटत रियाज उर्फ मिन्या शेख याच्या उजव्या हाताला गोळी लागून जखमी झाला.

मिन्या उर्फ रियाज शेख याने घटनास्थळावरून पलायन केले. हल्लेखोर युवकाने मिन्या उर्फ रियाज शेख याचा काही अंतरावर पाठलाग केला. त्याच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी हल्लेखोरांनी गोळीबार नंतर दुचाकीवरून पलायन केले आहे. यावेळी घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार संबंधित हल्लेखोरांनी 2 गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक डॉ.वैशाली कडुकर,शिरवळ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्यासह शिरवळ पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी व फॉरेन्सिक टिमने धाव घेतली. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

अन..शाळकरी मुली वाचल्या..!

शिरवळ येथे युवकावर गोळीबार होत असताना सायंकाळी शालेय विद्यार्थी घटनास्थळावरून जात होते.दरम्यान,अचानकपणे घडलेल्या घटनेमध्ये जर चुकून शालेय विद्यार्थ्याला गोळी लागली असती तर असा प्रश्न निर्माण होत असून विविध चर्चेला उधाण आले आहे.त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली न्हवती अशी म्हणण्याची वेळ सध्या शिरवळकर नागरिकांवर आली आहे. चौकट- आरोपी निष्पन्न.घटना सीसीटीव्हीमध्ये कैद शिरवळ येथे युवकावर गोळीबार झाल्यानंतर खळबळ उडाली असून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने शिरवळ पोलीसांनी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यादृष्टीने तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी व यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे ?यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहे.

Web Title: firing in shirwal satara and one youth injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.