शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-मिरज रेल्वेच्या व्हील ॲक्सल बॉक्सला आग, कऱ्हाड रेल्वे स्टेशनवरील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:45 IST

कऱ्हाड : कऱ्हाड रेल्वे स्टेशनवर मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज रेल्वेच्या इंजिन खालील व्हील ॲक्सल बॉक्सला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. ...

कऱ्हाड : कऱ्हाड रेल्वे स्टेशनवर मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज रेल्वेच्या इंजिन खालील व्हील ॲक्सल बॉक्सला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या घटनेमुळे प्रवाशांसह रेल्वे स्टेशनवर गोंधळ उडाला. घटनेचे गांभीर्य ओळखत कर्मचाऱ्यांनी आग विझविल्याने प्रवाशासह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य रेल्वेची पुणे-मिरज रेल्वे ही पुण्याहून मिरजला जाण्यासाठी सुटली. कऱ्हाड रेल्वे स्टेशनवर ही एक्स्प्रेस दुपारच्या सुमारास आली. स्टेशनवर आल्यानंतर अचानक इंजिन खाली असणाऱ्या ऑइल बॉक्सने पेट घेतला. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. प्रवाशासंह तेथे असणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. या रेल्वेच्या सात डब्यात सुमारे ३०० प्रवासी प्रवास करीत होते. आगीची घटना समजताच प्रवासी घाबरून रेल्वेतून खाली उतरले. रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे येथे ही घडलेली घटना कळविली. तोपर्यंत कऱ्हाड रेल्वे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्यानंतर लगेच वंदे भारत एक्स्प्रेसचे पुणे येथील पथक कऱ्हाड रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने सेफ्टी फायरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत कऱ्हाड नगरपालिकेचे अग्निशमन गाडीही घटनास्थळी पोहोचली. आग आटोक्यात येईपर्यंत सर्व प्रवाशांना दुसऱ्या रेल्वेने मिरजला पाठवण्यात आले. आग आटोक्यात आल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वेfireआग