साताऱ्यात बिर्याणी हाऊसला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 15:53 IST2019-10-11T15:52:43+5:302019-10-11T15:53:51+5:30
सातारा येथील क्रीडा संकुलामधील दादाज बिर्याणी हाऊसला आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास किचनमधील सिलिंडर गॅस लिक झाल्याने मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

साताऱ्यात बिर्याणी हाऊसला आग
ठळक मुद्देसाताऱ्यात बिर्याणी हाऊसला आगलाखो रुपयांचे नुकसान
सातारा : येथील क्रीडा संकुलामधील दादाज बिर्याणी हाऊसला आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास किचनमधील सिलिंडर गॅस लिक झाल्याने मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले. तेथील कामगारांनी बदलीतून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी नागरिकांची आणि बचावकार्य करणाऱ्यांची गर्दी झाली होती. आगीमध्ये दादाज बिर्याणी हाऊसचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोण जखमी झाले नाही.