शिरवळमधील शिर्के पेपर मिलला आग, गेल्या २५ दिवसांतील तिसरी घटना
By दीपक शिंदे | Updated: October 10, 2023 22:50 IST2023-10-10T22:49:02+5:302023-10-10T22:50:03+5:30
आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरु

शिरवळमधील शिर्के पेपर मिलला आग, गेल्या २५ दिवसांतील तिसरी घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, शिरवळ: खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील बंद असलेल्या ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजी (शिर्के पेपर मिल) ला आग लागल्याची घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या कंपनीला गेल्या २५ दिवसांमध्ये आग लागण्याची ही तिसरी घटना आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तातडीने शिरवळ पोलिस अधिकारी व कर्मचारी, शिरवळ रेस्क्यू टीम व औद्योगिक वसाहतीतील एशियन पेंन्ट्स कंपनीतील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आगीने रौद्ररुप धारण केल्याने व अंधार असल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना अनेक अडचणी येत होत्या. कंपनीच्या गेटला उच्च न्यायालयाचे सील असल्याने इमारतीमध्येही प्रवेश करता येत नव्हता. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरु होते.