शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रोमोग्राफिक स्टडीच्या माध्यमातून वेण्णा धरणाची गळती शोधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 15:44 IST

खडकवासला (पुणे) येथील केंद्र्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या तज्ज्ञ संशोधक पथकाने वेण्णा धरणास भेट देऊन गळतीची पाहणी करून अहवाल सादर केलेला आहे. या अहवालामध्ये टोमोग्राफिक स्टडीच्या माध्यमातून गळतीचा मार्ग शोधून केमिकल कंपाऊंड ट्रिटमेंटद्वारे गळती बंद करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे. या कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत असल्याची माहिती सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देकेंद्र्रीय जल, विद्युत संशोधन संस्थेच्या पथकाकडून पाहणीकेमिकल कंपाऊंड ट्रिटमेंटद्वारे गळती बंद करण्याबाबत अहवाल सादरकामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम

सातारा ,दि.  ०६ :  खडकवासला (पुणे) येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या तज्ज्ञ संशोधक पथकाने वेण्णा धरणास भेट देऊन गळतीची पाहणी करून अहवाल सादर केलेला आहे. या अहवालामध्ये टोमोग्राफिक स्टडीच्या माध्यमातून गळतीचा मार्ग शोधून केमिकल कंपाऊंड ट्रिटमेंटद्वारे गळती बंद करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे. या कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत असल्याची माहिती सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांनी दिली आहे.

महाबळेश्वर शहरास १९९२ पासून नगर परिषदेमार्फ त वेण्णा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. शहरासाठी वेण्णा धरणातून होत असलेला पाणीपुरवठा अपुरा होत असल्याचे निदर्शनास आल्याने १९८५ मध्ये धरणाचा पाणीसाठा वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला. त्यानुसार अधीक्षक अभियंता, परिसर अभियांत्रिकी मंडळ, सांगली या पाटबंधारे कार्यालयामार्फ त ५६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमतेच्या धरणाचे नियोजन करण्यात आले.

या धरणाच्या कामास पाटबंधारे यंत्रणेमार्फ त १९९४ पासून सुरुवात करण्यात आली व जून २००७ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले. सध्या धरणामध्ये पूर्ण क्षमतेने म्हणजेच ५६ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होत आहे. या धरणातील पाणीसाठ्याचा वापर महाबळेश्वर व पाचगणी या दोन शहरांना होत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या धरणाच्या भिंतीला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाला धोका निर्माण झाल्याने नुकतीच खडकवासला (पुणे) येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या तज्ज्ञ संशोधक पथकाने वेण्णा धरणाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच टोमोग्राफिक स्टडीच्या माध्यमातून गळतीचा मार्ग शोधून केमिकल कंपाऊंड ट्रिटमेंटद्वारे गळती बंद करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी