वेण्णा बोट क्लबमधील आर्थिक गळतीबाबत उचलले कडक पाऊल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 01:20 PM2017-10-21T13:20:27+5:302017-10-21T13:32:14+5:30

परतीच्या पावसाने वेण्णा तलाव पून्हा पूर्ण क्षमतेने भरल्याने गळतीबाबत पालिका प्रशासन गंभीर नसलेतरी वेण्णा बोट क्लबमधील आर्थिक गळतीबाबत उशीरा का होईना प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आर्थिक गळतीचा ठपका ठेऊन बोट क्लब अधीक्षकांसह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचे शहरातून स्वागत होत आहे.

Venna Boat Club took a tough step to finance the leak ... | वेण्णा बोट क्लबमधील आर्थिक गळतीबाबत उचलले कडक पाऊल...

वेण्णा बोट क्लबमधील आर्थिक गळतीबाबत उचलले कडक पाऊल...

Next
ठळक मुद्देवेण्णा तलाव बोट क्लबमधील सर्व कर्मचाऱ्यांची बदलीमहाबळेश्वर नागरिकांकडून कारवाईचे स्वागत

महाबळेश्वर, दि. २१ : परतीच्या पावसाने वेण्णा तलाव पून्हा पूर्ण क्षमतेने भरल्याने गळतीबाबत पालिका प्रशासन गंभीर नसलेतरी वेण्णा बोट क्लबमधील आर्थिक गळतीबाबत उशीरा का होईना प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आर्थिक गळतीचा ठपका ठेऊन बोट क्लब अधीक्षकांसह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचे शहरातून स्वागत होत आहे.


महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असलेले महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव व परिसर हे येथे सहलीसाठी आलेल्या अबालवृध्द पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. येथे चटपटीत खाद्य पदार्थांची रेलचेल असून घोडदौडीचा आनंदही येथे पर्यटकांना लुटता येतो. याबरोबर पालिकेने येथे नौकाविहाराची सोयही उपलब्ध केली आहे.

हा बोट क्लब पालिकेच्या उपन्नाच्या प्रमुख साधनांपैकी एक आहे. दरवर्षी या बोटक्लबमधून साधारणत: तीन कोटी रूपयांचे उपन्न पालिकेला मिळते. या ठिकाणी नेमणूक मिळावी यासाठी कर्मचारी वर्गात लॉबिंग सुरू असते. सत्ताधारी गटाशी एकनिष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यालाच याजागी नियुक्ती मिळते असे सांगितले जाते. या ठिकाणी अफरातफर करताना अनेकवेळा कर्मचाऱ्याना रंगेहात पकडण्यात आले आहे. परंतु, दरवेळी कर्मचारी आपली सुटका करून घेण्यात यशस्वी होतात.

आजपर्यंत अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न घटल्याचे वारंवार निर्दशनास आले आहे. तरीही केवळ समज देण्यापलीकडे पालिका प्रशासनाने काहीही केले नाही. मागील महिन्यातही असेच उत्पन्न घटल्याचे उघड झाले होते. मुख्याधिकाऱ्यानी संबंधित कर्मचाऱ्याना कार्यालयात बोलवून जाब विचारला. यावेळी केवळ समज देवून कर्मचाऱ्याना सोडण्यात आले. परंतु कोणावरही कारवाई करण्यात आली नव्हती.


कारवाई न करता सोडून देणे याचाच अर्थ भ्रष्ट कर्मचाऱ्याना पालिका प्रशासन पाठीशी घालत आहे, अशी टीका प्रशासनावर करण्यात येत होती. पालिका प्रशासन का बोटचेपे धोरण घेत आहे, असा प्रश्न नागरिक विचारीत होते. भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करता येत नसली तरी बोट क्लब विभागातून उचलबांगडी करून त्यांना दुसऱ्या विभागात का बदली केले जात नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात होता.


उत्पन्न घटल्याचे उघडकीस येऊन दीड महिना उलटला तरी कोणावरही कारवाई न केल्याने सत्ताधारी गटातील नगरसेवकांमध्येही नाराजी पसरली होती. सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्याना जाब विचारला.

सभेत नगराध्यक्षांच्या वतीने नगरसेवक कुमार शिंदे यांनी या विषयावर विशेष सभा व धोरणात्म निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. सत्ताधारी गटाबरोबरच विरोधी गटातील नगरसेवकांचा वाढता दबाव पाहता विशेष सभा घेण्यापूर्वीच पालिका प्रशासनाने या विभागातील उत्पन्न घटण्यास कारणीभूत असलेल्या कर्मचाऱ्याची बदली करण्याचा निर्णय घेतला.

 

Web Title: Venna Boat Club took a tough step to finance the leak ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.