शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

विधानसभेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून प्रारंभ; उमेदवार जाहीर करण्यात भाजप, वंचित आघाडी आघाडीवर 

By नितीन काळेल | Updated: October 21, 2024 19:54 IST

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून रणधुमाळी सुरू होत असून प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. यामुळे पहिल्या दिवशी अर्ज ...

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून रणधुमाळी सुरू होत असून प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. यामुळे पहिल्या दिवशी अर्ज कोण-कोण भरणार, त्यामध्ये दिग्गज असणार का ? याकडे लक्ष लागलेले आहे. तर निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात भाजप आणि वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होऊन सहा दिवस होऊन गेले आहेत. तरीही अजून महायुती तसेच महाविकास आघाडीतील जागा वाटप निश्चीत नाही. काही जागांवर एकमत असलेतरी अनेक जागांचा तिढाच आहे. त्यामुळे दावे-प्रतिदावे असणाऱ्या जागां वाटपाचं गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यातच महायुतीत विद्यमान आमदारांचे मतदारसंघ त्याच पक्षाकडे राहणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपने पहिली यादी प्रसिध्द करीत सातारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात विद्यमान दोन आमदारांवरच पुन्हा शिक्कामोर्तब केलंय.तसेच कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजपने पुन्हा अतुल भोसले यांनाच पसंदी दिली आहे. आता मंगळवारपासून प्रत्यक्षात निवडणुकीला सुरूवात होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी अर्ज भरण्यासाठी कोण-कोण पुढे येणार हे पाहणे महत्वाचे आहे.  जिल्ह्यात आठ मतदारसंघ असून आतापर्यंत भाजपचे तीन उमेदवार जाहीर झाले आहेत. सातारा, कऱ्हाड दक्षिण आणि माण मतदारसंघाचा समावेश आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही माण, कऱ्हाड दक्षिण आणि कोरेगावच्या उमेदवाराची घोषणा केलेली आहे. यामधील कोण पहिल्या दिवशी अर्ज भरणार याकडेही लक्ष असणार आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी