सोसायटीच्या हिशोबावरून जकातवाडीत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 18:41 IST2020-08-01T18:40:55+5:302020-08-01T18:41:38+5:30

गृहनिर्माण सोसायटीच्या मीटिंगमध्ये हिशोबावरून झालेल्या वादावादीतून एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना जकातवाडी (ता. सातारा) येथे घडली.

Fighting in the jakatwadi at the expense of the society | सोसायटीच्या हिशोबावरून जकातवाडीत हाणामारी

सोसायटीच्या हिशोबावरून जकातवाडीत हाणामारी

ठळक मुद्देसोसायटीच्या हिशोबावरून जकातवाडीत हाणामारीपाच वर्षांत केलेल्या खर्चाचा हिशोबावरून वादावादी

सातारा : गृहनिर्माण सोसायटीच्या मीटिंगमध्ये हिशोबावरून झालेल्या वादावादीतून एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना जकातवाडी (ता. सातारा) येथे घडली.

अलोक जयंत सिंग (रा. गणराया रेसिडेन्सी, जकातवाडी, ता. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवी कांबळे, अक्षय पराग सावंत, गणेश पराग सावंत, पराग सावंत व त्यांची पत्नी (सर्व रा. जकातवाडी, ता. सातारा) यांच्यावर सातारा तालुका पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. ३० रोजी रात्री साडेनऊ वाजता जकातवाडी येथील गणराया रेसिडन्सी या गृहनिर्माण संस्थेची मीटिंग सुरू होती.

यावेळी मागील पाच वर्षांत केलेल्या खर्चाचा हिशोबावरून वादावादी झाली. त्यानंतर संशयितांनी अलोक सिंग व इतरांना लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पुढील तपास हवालदार भोईटे हे करत आहेत.

 

Web Title: Fighting in the jakatwadi at the expense of the society