शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास लाखाच्या गोदामाचा मुहूर्त कुठाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 21:57 IST

शासकीय धान्याचा साठा करण्याची व्यवस्था असणारे पाटण येथील जुने गोदाम मोडकळीस आले आहे. त्यामुळे याठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या हजारो पोती धान्याची उंदीर आणी घुशी नासाडी करत आहेत

ठळक मुद्देधान्य घुशी, उंदरांच्या हवाली : मोडकळीस आलेल्या जुन्याच ठिकाणी साठा; पन्नास लाख खर्चलेले पाण्यात

पाटण : शासकीय धान्याचा साठा करण्याची व्यवस्था असणारे पाटण येथील जुने गोदाम मोडकळीस आले आहे. त्यामुळे याठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या हजारो पोती धान्याची उंदीर आणी घुशी नासाडी करत आहेत. ही नासाडी रोखण्यासाठी शिरळ येथे दोन वर्षांपूर्वीच ५० लाख रुपये खर्चून गोदाम बांधण्यात आले आहे. मात्र, उद्घाटनाचा मुहूर्त सापडत नसल्याने हे गोदाम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.

पाटण तालुक्याच्या पश्चिमेकडील म्हणजे कोयना, मोरगीरी, मणदुरे आणि पाटण, चाफळ या विभागांतील शेकडो रेशन दुकानदार पाटण येथील जुन्या शासकीय गोदामामधून धान्य उचलतात. अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या या जुन्या गोदामाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गहू, तांदूळ, साखर आणि इतर माल ठेवण्यास हे जुने गोदाम अपुरे पडत आहे. त्यामुळे शिरळ येथे सर्व सोयींनीयुक्त नवीन गोदाम शिरळ येथे बांधून ठेवले आहे. याठिकाणी सीसीटीव्ही, वीज, डांबरी रस्ते आदी सुविधा आहेत. सर्व सोयींनी हे नवीन गोदाम सज्ज करण्यात आहे. मात्र, तरीही ते गोदाम सुरू करण्यास पाटण तहसील कार्यालय पुढाकार घेत नाही. केवळ मतमोजणीसाठीच या नवीन गोदामाचा वापर केला जात आहे.

पाटण तालुक्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, कारखान्यासह अन्य निवडणुका चुरशिने पार पडतात. निवडणुका झाल्यानंतर यापुर्वी मतमोजणी कुठे करायची, असा प्रश्न निर्माण होत होता. आता शिरळ येथील नविन गोदाम त्यासाठी वापरले जात आहे. आत्तापर्यंत साखर कारखाना आणि पाटण नगरपंचायतीची मतमोजणी या गोदामात घेतली होती. या गोदामास आजअखेर कुलुप लावलेले आहे.पुरवठा निरीक्षकांकडून पाहणीशिरळचे गोदाम सुरू करण्यासाठी मध्यंतरी जिल्हा पुरवठा निरीक्षक यांनी गोदाम तपासणी केली होती. या पाहणीनंतर गोदाम वापरले जाण्याची शक्यता होती. त्यासाठी काही प्रमाणात कार्यवाहीसुद्धा करण्यात आली. मात्र, त्यानंतर एक वर्ष होऊन गेले तरीसुद्धा आजअखेर नवीन गोदामाचा वापर सुरू करण्यात आलेला नाही. जुन्या गोदामातच धान्यसाठा केला जात आहे. 

नव्या गोदामाची मोडतोड सुरूलाखो रुपये खर्चून बांधलेल्या नवीन गोदामास देखभाल करण्यासाठी तहसील कार्यालयाने सुरक्षारक्षक किंवा शिपाई नेमलेला नाही. त्यामुळे नवीन गोदामाची समाजकंटकांकडून मोडतोड सुरू आहे. सीसीटीव्ही, खिडकी, काचा, वीज दिव्यांची मोडतोड केली आहे. गोदाम वापरण्यासाठी या सर्वाची दुरुस्ती करावी लागणार आहे. 

शिरळ येथील नवीन गोदामासाठी आवश्यक असणारे किपरचे पद रिक्त आहे. त्यामुळे ते गोदाम बंद ठेवण्यात आले आहे. गोदाम किपरची नेमणूक झाल्यानंतर त्वरित जुन्या गोदामातील धान्यसाठा त्याठिकाणी हलवला जाणार आहे. सध्या पाटण, ढेबेवाडी, तारळे येथील तीन जुन्या गोदामांचा वापर करण्यात येत आहे.- रामहरी भोसले तहसीलदार, पाटणनवीन गोदामामध्ये साठा केलेला नाही. गोदामात १ हजार ८० मेट्रिक टन साठा होऊ शकतो. त्यामुळे जुन्या गोदामाचा वापर केला जात आहे. जुन्या गोदामाची साठवण क्षमता ५०० मेट्रिक टन आहे.- एम. एस. अष्टेकर पुरवठा निरीक्षक, पाटण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMONEYपैसा