स्वयंपाक गॅसचा भडका उडून महिला पोलीस कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 18:05 IST2022-01-12T14:47:16+5:302022-01-12T18:05:06+5:30

स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा भडका उडाला.

A female police officer was injured when a cooking gas exploded | स्वयंपाक गॅसचा भडका उडून महिला पोलीस कर्मचारी जखमी

स्वयंपाक गॅसचा भडका उडून महिला पोलीस कर्मचारी जखमी

सातारा : स्वयंपाकाच्या गॅसचा भडका उडून जिल्हा पोलीस दलातील एक महिला कर्मचारी भाजून गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.

संबंधित महिला पोलीस कर्मचारी घरात स्वयंपाक करत असताना अचानक त्याचा भडका उडाला. यामध्ये महिला पोलीस कर्मचारी भाजून जखमी झाली. हा प्रकार पतीच्या निदर्शनास आल्यानंतर पतीने तत्काळ महिला पोलीस कर्मचाऱ्याला पुणे येथे पुढील उपचारासाठी नेले. या घटनेची अद्यापपर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. 

दरम्यान, या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची माहिती घेतली. हा प्रकार नेमका कसा घडला याबाबत चौकशी करण्याचे आदेशही वरिष्ठांनी दिले असून, लवकरच यातील वस्तुस्थिती समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: A female police officer was injured when a cooking gas exploded