सचिन गायकवाडतरडगाव : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या सहापदरीकरणामुळे वाहतुकीबरोबर वाहनांचा वेग वाढला आहे. यामुळे अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. एखादा मोठा अपघात कधी होईल हे सांगता येणार नाही, अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे. मार्गातील काळज येथे रस्त्यालगत भरणाऱ्या भाजी मंडईमुळे अपघाताची दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिक व प्रवाशांतून व्यक्त होत आहे.लोणंद-फलटण मार्गातील काळज या ठिकाणी परिसरातील शेतकरी, व्यावसायिक रस्त्यालगतच भाजी विक्री करताना दिसत आहेत. खरं तर पालखी मार्गावर अशा पद्धतीने भाजीमंडई भरणे धोक्याचे आहे. विक्रेते हे मोठी जोखीम पत्करून स्वतःच्या जबाबदारीवर विक्री करीत असल्याचे बोलले जात आहे. खरेदी करण्यासाठीही ये-जा करणारे गर्दी करीत असल्याचे दिसते. भविष्यात अपघाताची मोठी घटना होऊ शकते याची जाणीव असतानाही याकडे कानाडोळा केला जात आहे.
वाचा : खंडाळा परिसर ठरतोय अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’; 'या' थांब्यांवर दुर्घटनेचे सावटमागील काही दिवसांत मार्गातील विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडून काहींना जिवास मुकावे लागले आहे. यामध्ये वेगमर्यादा, काही ठिकाणी कामाची चुकीची पद्धत, तर वाहनांचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याचे समोर आले आहे. रस्त्याच्या कामामुळे मार्गावरील प्रवास कमी वेळेत होत असला तरी होणाऱ्या दुर्घटना नजरेआड करून चालणार नाहीत. यासाठी अपघात टाळण्यासाठी वेळीच उपयोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
Web Summary : Satara's highway market poses accident risks due to increased vehicle speed from six-lane expansion. Locals fear a major accident near Kalaj, where farmers sell produce along the road. Despite past accidents and fatalities, safety measures are lacking, prompting urgent calls for action.
Web Summary : सतारा में राजमार्ग बाजार छह-लेन विस्तार से बढ़ी हुई वाहन गति के कारण दुर्घटना जोखिम पैदा करता है। स्थानीय लोगों को कालज के पास एक बड़ी दुर्घटना का डर है, जहाँ किसान सड़क के किनारे उपज बेचते हैं। पिछली दुर्घटनाओं और मौतों के बावजूद, सुरक्षा उपायों की कमी है, जिससे तत्काल कार्रवाई की मांग हो रही है।