अस्वलांची भिती... शेतकऱ्यांनी पडीक ठेवली शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:23 IST2018-12-21T23:23:12+5:302018-12-21T23:23:18+5:30
बामणोली : भांबवली परिसरात वन्यप्राण्यांनी दहशत माजवली असून, दिवसाढवळ्या, रात्री-अपरात्री अस्वलांचा फेरा जंगलातूनच नाही तर गावातूनही जाताना पाहायला मिळत ...

अस्वलांची भिती... शेतकऱ्यांनी पडीक ठेवली शेती
बामणोली : भांबवली परिसरात वन्यप्राण्यांनी दहशत माजवली असून, दिवसाढवळ्या, रात्री-अपरात्री अस्वलांचा फेरा जंगलातूनच नाही तर गावातूनही जाताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे भागातील अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या प्राण्यांच्या भीतीने भांबवली गावातील शेतकºयांनी यावर्षी शेती केली नाही. दूरची शेतीतर नाहीच; पण घराच्या जवळ, दारातली शेतीही पडीक ठेवली आहे.
आलवडी गावाजवळ अस्वलांनी विठ्ठल सुर्वे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्या दिवसापासून आलवडी गावाने जंगलात जाणे बंद केले आहे. गुरे-ढोरे घरीच बांधून असतात, फक्त पाण्यासाठी थोडावेळ सोडली जातात. भांबवलीच्या मागच्या बाजूला असलेल्या पिसाडी येथील भगवान माने यांच्यावरही अस्वलांनी हल्ला केला, त्यात ते वाचले. कारगावात तर बिबट्याने घरात घुसून वासरावर जीवघेणा हल्ला केला होता.