शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CM एकनाथ शिंदेंना भेटला वडिलांचा मित्र, गावात थांबला मुख्यमंत्र्यांचा ताफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 13:12 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावातून जात असताना वाटेत एक वृद्ध व्यक्ती त्यांची वाट पाहत उभे होते.

सातारा - राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे ३ दिवस सातारा दौऱ्यावर आहेत. म्हणजेच, सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या मूळगावी ते आहेत. त्यांच्यासमवेत अर्थातच यंत्रणांचा ताफा असून गावदौऱ्यातही त्यांच्याकडून कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील वाई तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला. त्यासाठी जात असताना मुख्यमंत्री शिंदेंनी आज त्यांच्या दरे या गावी वडिलांच्या मित्रासोबत आपुलकीने संवाद साधला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावातून जात असताना वाटेत एक वृद्ध व्यक्ती त्यांची वाट पाहत उभे होते. मुख्यमंत्र्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी, आपल्या गाडीचा ताफा थांबवत त्या वृद्ध व्यक्तीची भेट घेतली. या भेटीत त्यांच्यासमवेत आपुलकीचा संवादही साधला. माझे बाबा आणि तुम्ही एकत्र काम केलंय, बाबा आणि तुम्ही एकत्र होते, असे मुख्यमंत्र्यांनी विचारलं. त्यावर, हो.. हो असं त्या व्यक्तीने म्हटले. त्यानंतर मी बाबांना सांगतो असे म्हणत त्यांचं नाव विचारलं. त्यावेळी, दगडू हरी सुतार असं नाव त्यांनी सांगितलं.  बाकी बरंय ना, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी हात जोडून त्यांना नमस्कार केला. त्यानंतर, त्या वृद्धास व्यवस्थीत सोडा, असे सांगत मुख्यमंत्र्यांची गाडी पुढे निघून गेली. मुख्यमंत्री आणि वृद्ध सुतार यांच्यातील भेटीचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.  दरम्यान, आज सकाळी वाई बांबू लागवड अभियानाच्या उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. येथे स्थानिक शेतकऱ्यांच्या साथीने बांबूची रोपे लावून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. बांबूचे रोप हे बहुगुणी आणि अनेक गोष्टींसाठी वापरले जाते. विशेष म्हणजे या रोपाला सध्या प्रचंड मागणी आहे. हे झाड जेव्हा मोठे होते तेव्हा बांधकाम साहित्यात पराती उभारण्याच्या कामापासून ते अनेक सुंदर व मनमोहक कलात्मक वस्तू, फर्निचर, लेखणी, डायरी तसेच आता केंद्र सरकारच्या धोरणामुळे तर विमानतळ किंवा इमारतींचा सुशोभीकरणासाठी देखील बांबूचा वापर केला जातो. बांबू लागवडीचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना देखील व्हावा तसेच ग्रामस्थांनी देखील बांबू पिकाची जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करावी यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSatara areaसातारा परिसरFarmerशेतकरीwai-acवाईChief Ministerमुख्यमंत्री