शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

बसखाली चिरडून बालिकेसह पित्याचा मृत्यू

By admin | Updated: August 17, 2014 00:25 IST

पोवई नाक्यावर अपघात : कर्नाटक बसचालकाला चोप

सातारा : पोवई नाक्यावरील कालिदास पेट्रोलपंपासमोर एस. टी. बसखाली सापडून बालिकेसह पित्याचा दुर्दैवी अंत झाला. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या जमावाने बसचालकाला बेदम चोप दिला. ही हृदयद्रावक घटना आज, शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.रवींद्र तानाजी लावंड (वय ३०), श्रुती रवींद्र लावंड (६, सध्या रा. दौलतनगर, करंजे-सातारा, मूळ रा. खातगुण, ता. खटाव) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.रवींद्र लावंड हे आज, शनिवारी सकाळी मुलगी श्रुतीला घेऊन दुचाकीवरून (एमएच १२ एच ६७१७) भाजी आणण्यासाठी गेले होते. रविवार पेठेतील भाजी मंडईतून दुचाकीवरून ते परत घरी निघाले होते. त्यावेळी जिल्हा बँकेसमोरून कर्नाटक महामंडळाची एस. टी. बस (केई २२ एफ १९६१) येत होती. या बसने लावंड यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. लावंड आणि चिमुकली श्रुती दुचाकीवरून खाली पडले. दोघांच्या अंगावरून एस. टी. बसचे चाक गेले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा त्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ होती. त्यामुळे बघ्यांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. त्यातील काही संतप्त नागरिकांनी बसचालकाला बेदम चोप दिला. त्यामुळे पोवई नाक्यावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. काही वेळानंतर पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे घटनास्थळी पोहोचले. जमावाच्या तावडीतून सोडवून चालकाला त्यांनी रुग्णालयात दाखल केले.रवींंद्र लावंड हे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत काम करीत होते. काही वर्षांपूर्वी ते साताऱ्यात स्थायिक झाले होते. त्यांची पत्नी शिक्षिका आहेत, तर श्रुती ही पहिलीमध्ये शिकत होती. पती व मुलीचा अपघातात मृत्यू झाल्याने पत्नीला जबर मानसिक धक्का बसला आहे. (प्रतिनिधी)