शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

जिहे-कटापूर योजनेचे भाग्य उजळले, दुसरी सुधारित मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 18:28 IST

दुष्काळी माण आणि खटाव या दोन तालुक्यांसाठी वरदायिनी ठरणाऱ्या जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाने १ हजार ३३० कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे या योजनेचे भाग्यच उजळले असल्याने या निधीतून उर्वरित सर्व काम पूर्ण होणार आहेत.

ठळक मुद्देजिहे-कटापूर योजनेचे भाग्य उजळले, दुसरी सुधारित मान्यता१३३0 कोटी रुपयांचा निधी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

सागर गुजर सातारा : दुष्काळी माण आणि खटाव या दोन तालुक्यांसाठी वरदायिनी ठरणाऱ्या जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाने १ हजार ३३० कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे या योजनेचे भाग्यच उजळले असल्याने या निधीतून उर्वरित सर्व काम पूर्ण होणार आहेत.कृष्णा नदीचे पाणी उपसा करून ते नेर तलाव तसेच आंधळी धरणात नेऊन येरळा व माण या दोन नद्या वाहत्या करण्यात येणार आहेत. सातारा तालुक्यातील जिहे-कटापूर येथे कृष्णा नदीवर पंप हाऊस बांधण्यात आलेला आहे. तिथून शिरढोण (ता. कोरेगाव) येथील पंप हाऊसमध्ये पाणी नेण्यात येईल. तिथून जरंडेश्वर पंप हाऊसमधून वर्धनगड बोगदामार्गे हे पाणी नेर तलावात सोडण्यात येणार आहे. या तलावातून ते येरळा नदीत सोडण्यात येईल.येरळा नदीवर असलेल्या १५ केटीवेअर बंधाऱ्यांतून उपसा करून ते खटाव तालुक्यातील गावांना देण्यात येणार आहे. तसेच पुढे हेच पाणी आंधळी तलावात नेण्यात येईल, तिथून ते माण नदीत सोडून १७ केटीवेअर बंधाऱ्यांच्या माध्यमातून माण तालुक्यातील गावांना देण्यात येणार आहे.

दरम्यान, हे काम अनेक दिवस बंद होते. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिहे-कटापूर योजनेचे शिवधनुष्य उचलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा दौऱ्यावर असताना माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना ही योजना अनुशेषातून बाहेर काढण्याची मागणी केली. डॉ. येळगावकर, महेश शिंदे व लक्ष्मणराव इनामदार ट्रस्ट यांनी या योजनेचे नाव लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना असे नाव ठेवण्याची शिफारस केली.खटाव तालुक्यातील दरुज दराजाई तलावापासून सातेवाडी पेडगाव मांडवेसह, एनकुळ कणसेवाडी, या १७ गावांचा या योजनेत समाविष्ट केले. आंधळी धरणातून माणच्या उत्तर भागातून ३२ गावांचा समाविष्ट करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाई यांनी प्रयत्न केले व शासन स्तरावरदोन बैठका झाल्या व त्या भागाचा सर्व करण्याच्या कामाचे आदेश मिळवले. आमदार जयकुमार गोरे यांच्यासह माण, खटाव या दोन तालुक्यांतील नेतेमंडळी योजनेसाठी आग्रही होते.२६९ कोटींच्या योजनेचा खर्च वाढलासातारा सेवा निवृत्त अभियंता मंडळ व माजी सैनिक संघटना यांनी ही योजना तयार केली. जिहे-कटापूर योजना ही खटाव-माणला वरदायी ठरणार आहे. या योजनेला ११ फेब्रुवारी १९९७ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी ही योजना केवळ २६९.०७ एवढ्या रकमेची होती. युती सरकारने १९९७ मध्ये ही योजना सुरू केली. नंतर जिहे-कटापूर योजनेसाठी असलेली मशिनरी वर्धनगड बोगद्यातून हलवून जानाई शिरसाई योजनेकडे नेली होती. ती परत आणली.योजना पूर्णत्वाकडे जाणारजिहे-कटापूर योजनेला १ हजार ८५ कोटी रुपयांची पहिली सुधारित मान्यता मिळाली होती. त्यात रखडलेल्या योजनेचा काम वेगाने झाले. आता नव्याने १ हजार ३३0 कोटी रुपयांची दुसरी सुधारित मान्यता दिली गेल्याने या पैशांमध्ये आंधळी येथील उपसा सिंचनाचे काम पूर्ण होऊन माण तालुक्याला पाणी मिळणार आहे.

आघाडी शासनाच्या काळात जिहे-कटापूर योजनेचे काम बंद पाडण्यात आले होते. मी व सध्याचे सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांनी विधानभवनाबाहेर सलग तीन दिवस उपोषण केले होते.- डॉ. दिलीप येळगावकर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार