शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर भीषण धडक, आगीत चालक जागेवर जळून खाक

By दीपक शिंदे | Updated: August 12, 2024 11:53 IST

दुसऱ्या चालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू

कोरेगाव : सातारा-लोणंद-पुणे राष्ट्रीय महामार्ग आज, सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली येथे दोन भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दोन्ही ट्रकला आग लागली. त्यामध्ये एका ट्रकमधील चालकाला बाहेर पडता न आल्याने तो ट्रकमध्येच जागेवरच जळून खाक झाला. दुसऱ्या गंभीर जखमी चालकाला उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तर, आणखी दोघे गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. मात्र तब्बल दोन तासानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तो पर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. जखमी अन्य दोघांवर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत व जखमीची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातhighwayमहामार्गDeathमृत्यू