शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

मजूर तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचा पैरा !

By admin | Updated: May 6, 2015 00:14 IST

शामगाव परिसरातील चित्र : एकत्रित येऊन केली जातायत शेतीची कामे; ग्रामस्थांत एकोपा वाढण्यास मदत

शामगाव : शेती कामासाठी सध्या मजुरांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. तसेच उपलब्ध असणाऱ्या मजुरांचा दिवसभराच्या मजुरीचा खर्चही शेतकऱ्यांना परवडत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शामगाव विभागातील अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा जुनी ‘पैरा’ व ‘इर्झीक’ पध्दत वापरण्यास सुरूवात केली आहे. या पद्धतीमुळे मजुरांचा प्रश्न मिटत असून कामेही गतीने होत आहेत. शेतीची कामे करीत असताना मनुष्यबळाची जास्त गरज असते. शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडते. वेळी-अवेळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. या गडबडीत मजूर मिळत नाहीत. मिळालेच तर ते तेवढ्या गतीने कामही करीत नाहीत. त्यामुळे फक्त पैशाचा अपव्यय होतो व कामही वेळेत होत नाही, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पूर्वी यांत्रिकीकरण नव्हते तेव्हा बैलमालक एकत्र येऊन ‘पैरा’ पध्दत किंवा ‘इर्जिक’ पध्दतीने शेतीची कामे करीत. पूर्वी संकरीत बियाणे नसतानाही उत्पन्न भरघोस निघायचे. तसेच शेतीची नांगरट, कुळवट, फणनी, कोळपणी, धान्य वाहतूक, धान्य मळणी आदी सर्व कामे बैलाच्या सहाय्याने केली जात होती. प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान एक तरी बैल असायचा. चार शेतकरी एकत्र येवून पैरा पध्दतीने किंवा इर्झीक पध्दतीने कामे करीत. या पध्दतीत ज्या शेतकऱ्यांचे काम करायचे आहे त्यांच्यात इतर सर्वांनी एकत्र येवून दिवसाचे काम काही तासातच संपवायचे. त्या घरच्या महिलांनी सर्वांसाठी पुरणपोळीसारख्या गोडधोड जेवणाचा बेत करायचा. सर्व काम करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचदिवशी संध्याकाळी जेवण द्यायचे, अशी पूर्वी पद्धत होती. एकमेकांना द्यायला पैसाच नसल्याने ही पद्धत अवलंबली जायची. पैरापध्दतीत कधीकधी एकमेकांच्यात दिवस मोजून काम करायचे. सर्वांच्यात समान दिवस काम करण्याची पद्धत होती. त्याचबरोबर काम करणाऱ्या मजुराला पैशांऐवजी धान्य रूपात किंवा वस्तूरूपात मोबदला दिला जायचा.गत काही वर्षात यांत्रिकीकरणामुळे शेतीकामाच्या पद्धतीतही बदल झाला. मजूरी पैशात मोजली जाऊ लागली. बैलांऐवजी शेतीची मशागतीची कामे ट्रॅक्टर किंवा इतर यत्रांच्या सहाय्याने केली जाऊ लागली. त्यामुळे कामांना गती आली आहे. यांत्रिकीकरणामुळे माणूस आळशी बनला. त्यामुळे वेळेवर व अंग मोडून काम करणारे मजूर मिळत नाहीत. सर्वच ठिकाणी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पैरा पद्धत अवलबंली जात असल्याचे दिसते. शामगाव परिसरात पेरणीपासून ते काढणी, मळणी व वैरण लावण्यापर्यंत तरूण एकत्रित येऊन काम करीत आहेत. (वार्ताहर)