शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने केलाय शेतकऱ्यांचा वांदा!, 'स्वाभिमानी' टाकणार आमदार, खासदारांच्या दारात कांदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 16:19 IST

'शासनाने किमान हमीभाव तरी द्यावा'

रशीद शेखऔंध : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या खटाव तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला होता. मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी चांगले पैसे मिळतील, या आशेने कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले. मध्यंतरीच्या काळात हवामानातील बदलामुळे कांदा पिकावर करप्यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकऱ्यांनी खर्च करून फवारण्या केल्या. मात्र दर नसल्याने कोण आवाज उठविणार याकडे लक्ष लागले आहे.कांद्याला प्रतिकिलो ७ ते ८ रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणेही अवघड झाले आहे. कांद्याला मिळत असलेल्या अल्पदरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. व्यापाऱ्यांकडून कांद्याची खरेदी अल्पदराने होत असल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. अल्पदरामुळे कांदा ऐरणीत भरून ठेवायचा, विक्री करायचा तर दर येईपर्यंत तो टिकेल का, या संभ्रमावस्थेत शेतकरी आहेत.शेतकऱ्यांना कमी बाजारभावात सध्या नाइलाजास्तव कांदा द्यावा लागत आहे. कांदा लागण, भांगलन, फवारणी, उपटणे, काटणी या खर्चाचा हिशोब केला तर येथून पुढे कांदा करायचा की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे शासनाने किमान हमीभाव तरी द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.आमदार, खासदारांच्या दारात कांदा टाकणारकांदा दराबाबतीत सत्ताधारी आमदार, खासदारांनी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते, तर विरोधी पक्षातील नेत्यांना आवाज उठविण्याची मोठी संधी होती; मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याची कोणाची तयारी दिसत नाही, त्यामुळे येत्या आठवड्यात जिल्ह्यातील आमदार, खासदारांच्या घरापुढे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी कांदा टाकून आंदोलन करणार आहोत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरonionकांदाFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना