शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: नीरा कालव्याचे पाणी पेटले; फलटणला शेतकरी एकवटले!; आवर्तन सुरू करण्यासाठी काढला विराट मोर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 11:57 IST

माळशिरस, सांगोला, फलटणमधील शेतकरी आक्रमक

फलटण (सातारा) : नीरा उजवा कालव्यातील पाण्यावरून माळशिरस, सांगोला आणि फलटण येथील शेतकरी आक्रमक झाले असून, तिन्ही तालुक्यांतील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी फलटण येथील उपअभियंता नीरा उजवा कालवा कार्यालयावर विराट मोर्चा काढला. शेतीसाठी आवर्तन पुन्हा सुरू केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धार करीत आपल्या मागण्यांचे निवेदन कार्यकारी उपअभियंता यांना देण्यात आले.नीरा कालव्याचे आवर्तन अचानक बंद करण्यात आल्याने तिन्ही तालुक्यांतील शेतकरी संतप्त झाले आहेत. आवर्तन पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी सोमवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला तिन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी सकाळपासूनच शेतकरी नीरा कालवा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जमू लागले. हळूहळू ही गर्दी वाढत गेली. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन व राजकीय हस्तक्षेपामुळे आवर्तन बंद करण्यात आल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.कालवा सुरू करताना कालवा सल्लागार समितीतील सदस्यांना सांगता, मग बंद करताना कोणाला विचारून बंद केला, असा सवाल रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांना दि. १९ मेपर्यंतची मुदत देत आवर्तन पूर्ण करून मग उर्वरित कामे मार्गी लावावीत, अन्यथा याहीपेक्षा मोठा मोर्चा काढला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. आमदार दीपक चव्हाण यांनी चोवीस तासांत दुरुस्तीचे काम करून पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.या मोर्चात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, रणजीतसिंह मोहिते-पाटील, आमदार दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, धैर्यशील मोहिते-पाटील, उत्तमराव जानकर यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.दुरुस्तीसाठी कालवा बंदनीरा उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना कालव्याला मोठे भगदाड पडल्याने कालवा बंद करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. नीरा उजवा कालव्याचा विसर्ग पूर्ववत केल्यास गळती वाढण्याची शक्यता आहे. कालव्यालगत असलेल्या लोकवस्तीत पाणी शिरून वित्त व जीवितहानी होऊ शकते, अशी माहिती नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.हक्कभंग आणूकालवा दुरुस्तीच्या कामी कोणती यंत्रणा सक्रिय आहे, असे रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी विचारले असता, दोन पोकलँड व दोन जेसीबीच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र शेतकऱ्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, तिथे केवळ दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी आढळून आला. यावरून रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी अधिकारी जनतेसमोर खोटी माहिती देत असल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणू, असा इशारा दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणWaterपाणीFarmerशेतकरीagitationआंदोलन