शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आदर्की खुर्द येथे कुऱ्हाडीचा घाव घालून शेतकऱ्याचा खून; बांधावरून बोअरवेलची गाडी नेल्याने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 12:35 IST

एका तासात आरोपीला अटक

आदर्की : फलटण तालुक्यातील आदर्की खुर्द येथे बोअरवेल मशीन व पिकअप वाहन बांधावरून नेल्याने बांध खराब झाला. या कारणावरून चंद्रशेखर बबनराव निंबाळकर (वय ४८, रा. आदर्की खुर्द, ता. फलटण) या शेतकऱ्याचा एकाने डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या प्रकारानंतर लोणंद पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

सयाजी शंकर निंबाळकर (वय ५१, रा. आदर्की खुर्द, ता. फलटण) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आदर्की खुर्द (ता. फलटण) गावच्या हद्दीत चिंचेचा मळा नावचे शिवार आहे. या शिवारात चंद्रशेखर निंबाळकर यांनी सयाजी निंबाळकर याच्या शेताच्या बांधावरून चार दिवसांपूर्वी बोअरवेलची मशीन व पिकअप वाहन नेले होते. त्यामुळे बांध खराब केल्याचा राग सयाजी निंबाळकर याच्या मनात होता.मंगळवार दि. २ रोजी सायंकाळी दोघेही चिंचेचा मळा नावाच्या शिवारात गेले होते. त्यावेळी सयाजी निंबाळकर याने चंद्रशेखर निंबाळकर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकाराची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांना उपचारासाठी फलटण येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.खुनाची घटना पोलिसांना समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यादरम्यान संशयित सयाजी निंबाळकर याला पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक केली. न्यायालयाने त्याला दि. ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले हे करीत आहेत.

दिवसा वाढदिवसाचे, तर सायंकाळी श्रद्धांजलीचे मेसेज..चंद्रशेखर निंबाळकर यांचा वाढदिवस दि. २ रोजी असल्याने गावच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर वाढदिवसाच्या शुभेच्छा अनेकजण त्यांना देत होते. तर सायंकाळी चंद्रशेखर यांचा मृत्यू झाल्याचे समजताच गाव सुन्न झाले. व्हॉट्सॲप ग्रुपवर अखेर श्रद्धांजलीचे मेसेज फिरू लागले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस