शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Satara: भुसुरुंग स्फोटात दगड लागून शेतकऱ्याचा मृत्यू; ‘पेयजल’च्या कामावेळी घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:42 IST

अधिकारी, ठेकेदारासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कऱ्हाड (जि.सातारा) : पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी भुसुरुंगाचा स्फोट केल्यानंतर दगड उडून लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दत्तात्रय पांडुरंग बामणे (वय ५५, रा.कार्वे), असे दगड लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कार्वे (ता.कऱ्हाड) येथे शुक्रवारी, दि. ११ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी मंगळवारी कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात योजनेचे अधिकारी, ठेकेदार, भुसुरुंग स्फोटाचे काम करण्याकरिता वापरलेल्या वाहनाचा चालक व मालक, तसेच कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत धीरज दत्तात्रय बामणे याने पोलिसांत फिर्याद दिली आहे.कार्वे ते कोडोली जुना रस्ता येथील शिवारात गत महिन्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत पेयजल योजनेच्या विहिरीचे काम चालू आहे. त्या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी सुरुंगाचा वापर करून अधूनमधून स्फोट करण्यात येत असतो. शुक्रवारी, दि. ११ सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय बामणे हे त्यांच्या शिवारातील शेतात गेले होते. त्यांच्या शेताच्या जवळच पेयजल योजनेच्या विहिरीचे काम सुरू होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विहीर खोदण्यासाठी भुसुरुंगाचा स्फोट करण्यात आला. त्यावेळी स्फोटात वेगाने उडालेला दगड दत्तात्रय बामणे यांच्या पाठीवर उजव्या बाजूला जोराने लागल्याने त्यांच्या बरगड्या तुटून फुप्फुसामध्ये रक्तस्राव झाला. त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात येत असताना वाटेतच दत्तात्रय बामणे यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडFarmerशेतकरीDeathमृत्यू